बंगळुरू : टिपू सुलतानने कर्नाटकच्या बांधलेल्या विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थना करण्याची परवानगी हिंदू संघटनांनी मागितली आहे. वाराणसीची ज्ञानवापी वादग्रस्त रचना हे मंदिर असल्याचा भक्कम पुरावा मिळाल्यानंतर आता कर्नाटकात एक मागणी करण्यात आली आहे. विजयनगर साम्राज्याच्या श्रीरंगपटना किल्ल्यातील जामिया या विशिष्ट धर्माचे प्रार्थना स्थळ आहे. तिथे हनुमानाचे मंदिर असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. हे त्याच्या भिंती आणि खांबांवरून स्पष्ट होते.
नरेंद्र मोदी विचार मंचच्या नेत्यांचे म्हणण्यानुसार त्यांनी मंड्या जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. या निवेदनात श्रीरंगपटना किल्ल्याच्या आवारात असलेल्या तलावात पूजा करण्याची आणि स्नान करण्याची परवानगी मागितली आहे. मंचचे राज्य सचिव सीटी मंजुनाथ यांनी सांगितले की, हनुमान मंदिर पाडून हे विशिष्ट धर्मीयांचे प्रार्थनास्थळ बांधण्यात आली आहे.
या हनुमान मंदिराचे नाव अंजनेय मंदिर असल्याचा दावा संस्थेचे लोक करतात. विजयनगर साम्राज्य ताब्यात आल्यानंतर मंदिराचे रूपांतर विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळासाठी केले. यासाठी टिपू सुलतानने पर्शियाचा राजा खलिफाला पत्र लिहिल्याचा ऐतिहासिक पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला. संस्थेच्या लोकांनी या कागदपत्रांचा विचार करून पुरातत्व विभागाकडे (एएसआय) चौकशी करण्याची विनंती केली आहे. हा किल्ला, त्याच्या इमारती 'एएसआय'च्या अंतर्गत आहेत