मथुरा: ज्ञानवापीच्या वादग्रस्त रचनेत शिवलिंग सापडल्यानंतर आता मथुरेच्या शाही इदगाह मशिदी परिसराबाबत बाबत नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. ही मशिदीला तात्काळ टाळेबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तिथले पुरावे नष्ट होऊ शकतात अशी भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत ते टाळेबंद करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने पुराव्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी मागणी आहे. अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांनी मुथरा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी दीर्घकाळ लढा देत आहेत.
शाही इदगाह मशिद परिसरामध्ये केवळ सुरक्षा व्यवस्थाच कडक करून चालणार नाही. तर, प्रवेश आणि बाहेर जाण्यास बंदी घालण्यात यावी. आणि त्यासाठी विशेष सुरक्षा अधिकारी नेमण्यात यावा. अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. श्रीकृष्णजन्मभूमीच्या अवशेषांशी छेडछाड झाली तर या ठिकाणचे स्वरूप बदलेल. आणि मग तिच्या मुक्तीसाठी न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाला कोणताही आधार राहणार नाही, असे अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह म्हणले. या याचिकेवर मंगळवारी दि. १७ सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदू प्रतीकांची नासधूस रोखण्यासाठी मशीद टाळेबंद करणे आवश्यक आहे. असे याचिकेत म्हटले आहे. ज्ञानवापीच्या धर्तीवर येथे 'सीआरपीएफ' तैनात करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेसोबत वाराणसी न्यायालयाच्या आदेशाची प्रतही देण्यात आली आहे.