दक्षिण कोरियाही ‘क्वाड’मध्ये!

    14-May-2022   
Total Views | 75
coriya
 
 
 
 
 
कोरियन द्वीपकल्पातील एकमेकांच्या सीमा परस्परांना भिडलेल्या पण, एकाच देशाचे दोन तुकडे झालेल्या उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांत विसंगती आहे.
 
 
 
कोरियन द्वीपकल्पातील एकमेकांच्या सीमा परस्परांना भिडलेल्या पण, एकाच देशाचे दोन तुकडे झालेल्या उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांत विसंगती आहे. नुकतीच दक्षिण कोरियात लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडली आणि तिथे नवे अध्यक्ष सत्तेवर आले. यूं सुक-योल त्यांचे नाव. १० मे रोजी त्यांनी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षपदाचा कारभार हाती घेतला. पण, आतापर्यंत दक्षिण कोरियाची ओळख नेमस्त देश अशी होती, ती बदलण्याच्या तयारीनेच यूं सुक-योल सत्तेवर आल्याचे त्यांच्या वक्तव्यांतून दिसून येते.
 
 
 
दक्षिण कोरियाच्या राजकारणात आमूलाग्र परिवर्तन आल्याचे यूं सुक-योल यांच्या सत्तारोहणाने स्पष्ट झाले आहे. यूं सुक-योल कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे आहेत. दक्षिणपंथी राजकारण करणारा विद्यमान सत्ताधारी पक्ष उत्तर कोरिया आणि चीनविरोधात कठोर धोरण अवलंबणारा आहे. याच कारणाने दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यूं सुक-योल ‘क्वाड’मध्ये सहभागी होण्याचा विचार करत आहे. दक्षिण कोरिया आशियातील महत्त्वाचा आणि शक्तिशाली देश आहे. उत्तर कोरियाबरोबर दक्षिण कोरियाचे अनेक वर्षांपासून हाडवैर आहे. उत्तर कोरियाबरोबरील वादामुळे दक्षिण कोरियाचे मुत्सद्देगिरीच्या दृष्टिकोनातून जागतिक राजकारण वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण झाले आहे. याव्यतिरिक्त आपली उन्नत तंत्रज्ञानात्मक क्षमता आणि उन्नत अर्थव्यवस्था तथा मजबूत संरक्षणविषयक साहित्य उत्पादनामुळे दक्षिण कोरिया अतिशय महत्त्वाचा आहे.
 
 
 
आतापर्यंत दक्षिण कोरियाने उत्तर कोरियासह चीनविरोधात एका बचावात्मक धोरणानुसार वाटचाल केली. पण, आता दक्षिण कोरियाच्या इतिहासात प्रथमच एखादा अध्यक्ष चीन आणि उत्तर कोरियाविरोधात कठोर धोरण आखण्याची विधाने करत आहे. आपल्या निवडणूक प्रचार मोहिमेवेळीही विद्यमान अद्यक्ष यूं सुक-योल उत्तर कोरियाला धडा शिकवण्याची भाषा करत होते. तसेच, “मी निवडून आल्यास अमेरिका आणि जपानबरोबरील संबंध सुधारण्याला आपले प्राधान्य असेल,” असेही ते प्रचारात म्हणत होते. तसेच, चीनबरोबरील संबंध द्विपक्षीय आदर व सन्मानाच्या आधारावरच चालतील, असे ते म्हणाले होते. सोबतच आमंत्रण मिळाल्यास आपण ‘क्वाड’मध्ये सहभागी व्हायला तयार आहोत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
दरम्यान, दक्षिण कोरियाने ‘क्वाड’मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर चीनने मात्र रडारड सुरू केली आहे. चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने दक्षिण कोरियाच्या ‘क्वाड’मध्ये सामील होण्याच्या विधानावर संपादकीयच लिहिले आहे. दक्षिण कोरिया ‘क्वाड’मध्ये सहभागी झाल्यास, तो ‘क्वाड’ गटातील देशांच्या हातचे प्यादे होईल, असे चीनने म्हटले आहे. चीनच्या या शब्दांतून आणि दक्षिण कोरियाच्या ‘क्वाड’मध्ये सहभागी होण्याच्या इच्छेतून चीन-अमेरिकेतील शीतयुद्धात दक्षिण कोरिया सक्रिय भूमिका निभावण्यासाठी तयार आहे, हे दिसून येते. अर्थात, त्यासाठी दक्षिण कोरियाला अमेरिकेच्या पाठिंब्याचीही आवश्यकता असणारच. दक्षिण कोरियाच्या धोरणबदलाचा थेट परिणाम चीनच्या भूमिकेवर पडत आहे. दक्षिण कोरियाने ‘क्वाड’मध्ये सामील होण्याचे विधान केल्यानंतर लगेचच चीनचे उपाध्यक्ष दक्षिण कोरियाच्या दौर्‍यावर गेले.
 
 
 
‘क्वाड’मधील अमेरिका आणि भारताबरोबर दक्षिण कोरियाचे आधीपासूनच लष्करी संबंध आहेत. भारत दक्षिण कोरियाकडून रणगाड्यासारखी संरक्षण उत्पादनेही खरेदी करतो. दोन्ही देशांतील आर्थिक संबंधही बळकट आहेत. कोरियाच्या अनेक मोबाईल, ऑटोमोबाईल व अन्य क्षेत्रातल्या कंपन्या भारतात कार्यरत आहेत, अशा स्थितीत दक्षिण कोरियाचे ‘क्वाड’मधील आगमन भारतासाठीही चांगले ठरू शकते. मात्र, ‘क्वाड’ची स्थापना वेगळ्या उद्देशाने झालेली असून, दक्षिण कोरिया ‘क्वाड’मध्ये आल्यास ‘क्वाड’ उत्तर कोरिया केंद्रित व्हायला नको, याची खबरदारी बाळगली पाहिजे. ‘क्वाड’चा मूळ उद्देश चिनी विस्तारवाद रोखण्याचा आहे. पण, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियातील शत्रुत्व ‘क्वाड’ला मूळ उद्देशापासून दूर नेऊ शकते. त्यामुळे द. कोरियाने भारताच्या पावलावर पाऊल ठेवावे, भारत ‘क्वाड’चा उपयोग पाकिस्तानविरोधासाठी करत नाही. अशाप्रकारे दक्षिण कोरियानेही उत्तर कोरियाबरोबरील संघर्ष ‘क्वाड’व्यतिरिक्त सोडवला पाहिजे. तेच ‘क्वाड’साठी हितकारक ठरेल.
 
 
 
 
 

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121