वाराणसी (Gyanvapi Survey) : काशी विश्वनाथ मंदिर परिसरातील ज्ञानवापी वादग्रस्त ढाँच्याच्या शनिवारी होणाऱ्या सर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आले आहे. उर्वरित सर्वेक्षण रविवार दि. १४ मे रोजी होणार आहे. इथे व्हीडिओग्राफीही सुरू आहे. माँ श्रृंगार गौरीच्या पूजा प्रकरणाची कार्यवाही न्यायालयाने नियुक्त केलेल्या अॅडव्होकेट कमिश्नरांच्या नेतृत्वात सुरू आहे. मंदिराच्या तळघरात चार खोल्या आणि पश्चिमेकडील भागातील भिंतींचे छायाचित्रण पूर्ण झालेले आहे. ‘विश्व वैदिक सनातन संघातर्फे दावा करण्यात आला आहे की, इथे आमच्या कल्पनेपेक्षा मोठ्या गोष्टी आढळू शकतात. (Gyanvapi Survey )
संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र सिंह बिसेन यांना विचारण्यात आले आहे की, ज्ञानवापीतील वादग्रस्त ढाँच्यातील व्हीडिओ ग्राफीत मिळालेल्या गोष्टींमुळे स्वतः तहैराण आहेत. ते म्हणाले की, "इथे आम्ही जी कल्पना केली होती, त्यापेक्षाही मोठ्या गोष्टी आढळल्या आहेत. त्यांनी माहिती दिली की, काही टाळी तोडावी लागली आहेत. त्यांनी सांगितले की, सर्वेक्षणात बऱ्याच काही गोष्टी आढळल्या आहेत. लवकरच तिथल्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट उघड होईल."
जितेंद्र सिंह बिसेन म्हणाले की, "न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सर्वेक्षण सुरू आहे. दोन्हीही बाजूच्या पक्षांनी आपली मते मांडली आहेत. सर्वच गोष्टी प्रसारमाध्यमांपुढे मांडल्या जाऊ शकत नाहीत. दोन्ही पक्षांच्या संमतीनेच सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. वकीलांनी सांगितल्यानुसारच कुठल्याही प्रकारच्या अटीशर्थी ठेवलेल्या नाहीत." शनिवारी हे सर्वेक्षण चार तास सुरू होते. यात वादी प्रतिवादी आणि पोलीस प्रशासनही उपस्थित होते.
यापूर्वीच न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली आहे की, जो कुणी यात आठकाठी आणेल त्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, सर्वेक्षणाचा हा अहवाल गोपनीय ठेवण्यता आला आहे. तसेच या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती देणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे. रविवारी १५ मे रोजी सर्वेक्षण आणि व्हीडिओग्राफीचे काम सुरू राहणार आहे. सर्वेक्षण कधी संपणार, त्याबद्दल अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. ज्ञानवापी येथे आढळलेल्या चार खोल्यांपैकी एका खोलीवर हिंदू पक्षकारांचे नियंत्रण असल्याचीही माहिती आहे.
ज्ञानवापी परिसर काशी आणि श्रीकृष्ण जन्मभूमि मथुरेच्या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करणे बंद करावे. तिथले सर्वेक्षण हे न्यायालयाच्या निर्देशाद्वारे सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाची वाट प्रत्येकाने पहायला हवी. तसेच न्यायालय जो काही निर्णय देईल त्याचा स्वीकार केला पाहिजे. - केशव प्रसाद मोर्या, उप-मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश