कुठल्याही स्थितीत ‘बीकेसी’तील कार्यक्रम होऊ देणार नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2022   
Total Views |
Untitled design
 
 
 
 
 
मुंबई : ख्रिश्चन समाजातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या पाद्री बजिंदर सिंह यांच्या गुरुवार, दि. १२ मे रोजी मुंबईतील ‘बीकेसी’ परिसरात होणार्‍या कार्यक्रमाला शीख समुदायातील व्यक्तींनी कडवा विरोध दर्शवला आहे. काहीही झाले, तरी बजिंदर सिंह यांचा मुंबईतील प्रस्तावित कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शीख समुदायाने घेतला आहे.



दरम्यान, पाद्री बजिंदर सिंहविरोधात करण्यात येत असलेल्या या निषेध प्रकरणी शीख समाजातील व्यक्तींनी बुधवार, दि. ११ मे रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत आपले निवेदन सादर केले. राज्यपालांच्या भेटीनंतर शीख समुदायातील काही व्यक्तींनी या संदर्भात दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
असे प्रकार मुंबईत होऊ देणार नाहीत पाद्री बजिंदर सिंह यांच्याकडून पंजाबात मोठ्या प्रमाणात धर्मांतरणाचे करण्याचे प्रकार प्रामुख्याने सुरू आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे खटलेदेखील दाखल करण्यात आलेले आहेत. दिल्ली पोलिसांकडून त्यांना अटकही करण्यात आली होती.


अशा कुठल्याही स्थितीत ‘बीकेसी’तील कार्यक्रम होऊ देणार नाही! व्यक्तीकडून मुंबईत काही वेगळाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यात अनेक वेगळे प्रकार होण्याची आम्हाला शंका आहे. शीख समाज हा सेवेसाठी ओळखला जात असून अशाप्रकारच्या गोष्टींना धर्मात थारा नाही. त्यामुळे असे प्रकार मुंबईत होऊ देणार नाहीत हे निश्चित, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता विकी थॉमस यांनी दिली.
 
 
 
समाजाने आवाज उठविणे आवश्यक


पाद्री बजिंदर सिंह यांच्यावर आजवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप लागलेले आहेत. त्यात एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोपही आहे. याबाबतीत समाजमाध्यमांवरही अनेक प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या व्यक्तीकडून जर धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली काही प्रकार केले जात असतील, तर त्याचा सर्वसामान्य जनतेनेही विचार करणे आवश्यक आहे.


समाजाने या विरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे. राज्यपाल महोदयांनी या बाबत निवदेन देण्यात आले असून ते यावर उचित कारवाई करतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र टँक लॉरी असोसिएशनचे सरचिटणीस सतनाम सिंह बाजवा यांनी दिली.
 
 
 
अखेरपर्यंत विरोध सुरूच राहणार!


हा कार्यक्रम होऊ नये यासाठी मुळात सरकारनेच पुढाकार घेऊन भूमिका घ्यावी, अशी आमचीही मागणी आहे. काळा जादू आणि असे प्रकार या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी विशेष कायदे करण्यात आलेले आहेत, त्याचा वापर करून हे प्रकार थांबविण्यात यावेत. आम्ही सरकार आणि संबंधितांना हा कार्यक्रम रोखण्यासाठी आम्ही निवेदन दिले असून आम्ही अखेरपर्यंत या कार्यक्रमाला विरोध करतच राहू.
- जसपाल सिंग सिद्धू, अध्यक्ष सुप्रीम कौन्सिल, नवी मुंबई
 
 
 

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@