हृदयविकार हद्दपार करण्यासाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2022   
Total Views |


HA
 
 
 
  
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावणार्‍यांची संख्या आणि आकडेवारी लक्षात घेता त्याबद्दल अद्याप संशोधन का झालेले नाही, हृदयविकार टाळता येऊ शकला असता का किंवा तत्सम आजारांवर मात करणे संशोधकांना आजवर जमले का नाही, असा प्रश्न पोटतिडकीने विचारला जातो.
 
 
 
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावणार्‍यांची संख्या आणि आकडेवारी लक्षात घेता त्याबद्दल अद्याप संशोधन का झालेले नाही, हृदयविकार टाळता येऊ शकला असता का किंवा तत्सम आजारांवर मात करणे संशोधकांना आजवर जमले का नाही, असा प्रश्न पोटतिडकीने विचारला जातो. हृदयविकाराने मृत्यू पावणार्‍यांच्या संख्येच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर याबद्दलची दाहकता लक्षात येईल. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मते, २०१९ मध्ये हृदयविकाराने मृत्यू झालेल्यांचा आकडा १.८ कोटी इतका प्रचंड आहे. त्यातील ८५ टक्के जणांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची नोंद आहे. इतक्या मोठ्या आजारावर आजपर्यंत बर्‍याच प्रकारचे संशोधन झाले. मात्र, हृदयविकाराच्या आजाराबद्दल परिणामकारक निष्कर्ष अद्याप निकाली लागला नव्हता. मात्र, अमेरिकेतून याबद्दलची एक आनंदाची बातमी याच आठवड्यात आली. बाजारात मिळणारी औषधे, इंजेक्शन शरीरातील ‘कोलेस्ट्रॉल’ कमी करतील, याची खात्री आहे. मात्र, त्यामुळे हृदयविकार बरा होईल, याबद्दल साशंकता कायम आहे. तसेच, हृदयविकाराच्या झटक्याला टाळता येईल, असेही नाही. याच समस्येवर तोडगा म्हणून आता संशोधन सुरू आहे. अमेरिकन ‘बायोटेक’ कंपनी ‘वर्व थेराप्युटिक्स’मध्ये याबद्दलचे संशोधन पूर्ण झाले असून, त्याच्या मानवी चाचण्या बाकी आहेत. कंपनीचे सीईओ डॉ. सेकर कथिरेसन यांनी याबद्दल माहिती दिली आहे. मानवाच्या शरीरातील ‘डीएनएत’ बदल करून शरीरातील वाईट ‘कोलेस्ट्रॉल’चे प्रमाण कमी केले जाऊ शकते. हाच हृदयविकारावर प्रमुख उपाय ठरू शकतो. त्यामुळे हा दावा खरा ठरल्यास कित्येक हृदयविकाराच्या रुग्णांवर इलाज सहज शक्य आहे. याबद्दल संशोधनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हृदयविकार असणार्‍या रुग्णांवर याची चाचणी होणार आहे. उच्च ‘कोलेस्ट्रॉल’मुळे हृदयविकाराचा झटका येणार्‍यांचे प्रमाण भारतातही तितकेच अधिक आहे.
 
 
 
जगभरात एकूण ३.१ कोटी रुग्णांना उच्च ‘कोलेस्ट्रॉल’चा त्रास होतो. वाईट ‘कोलेस्ट्रॉल’ला रोखण्याचे हे तंत्र यशस्वी ठरले, तर त्यानंतर तरुणांवरही याची चाचणी केली जाणार आहे. तरुणांमध्ये हृदयविकाराच्या समस्या लक्षात घेता, या वर्गातही जीव गमावणार्‍यांची संख्या अधिक आहे. ३० ते ४० पर्यंतच्या वर्गाला याचा अधिक फटका बसल्याचीही आकडेवारी सांगते. त्यामुळे वाईट ‘कोलेस्ट्रॉल’ रोखण्याचे हे तंत्र यशस्वी ठरल्यास तरुणांच्या वयोगटातील हृदयविकार हा वेळेपूर्वी रोखता येईल, असा दावा संशोधक करत आहेत. अर्थात, या सर्व गोष्टी अद्याप जर-तरच्याच आहेत. याची विशिष्ट कालमर्यादाही कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे हृदयविकारावरील संशोधनातून पुढील काळात सकारात्मक असा उपाय मिळेल, अशी अपेक्षा आहे. डॉ. कथिरेसन हे हार्वर्डचे प्रसिद्ध अनुवंशशास्त्रज्ञ आणि हृदयविकारतज्ज्ञ आहेत. सध्या ते अशा जनुकीय जीवाणूच्या शोधात आहेत की, ज्यामुळे शरीरातील वाईट ‘कोलेस्ट्रॉल’ कमी केले जाऊ शकते. हृदयविकार आणि झटका याला कारणीभूत असलेल्या वाईट ‘कोलेस्ट्रॉल’वर मात करणे शक्य झाल्यास या मोठ्या आजाराच्या जखडातून रुग्णाला वाचवता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे हृदयविकाराची संभाव्यताही कमी होऊ शकते. सध्या संशोधक शरीरात वाईट ‘कोलेस्ट्रॉल’ बंद करणारी जनुकीय प्रक्रिया बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत 
त्यामुळे वर्व थेराप्युटिक्स असे औषध बनवण्याच्या तयारीत आहे की, ज्यामुळे रुग्णाच्या ‘डीएनए’च्या दोन अनुवांशिकांना लक्ष्य करण्याचे काम करेल. औषधी नावे अनुक्रमे ‘पीसीएसके’-९ आणि ’एएनजीपीटीएल’-३, अशी आहेत. काही रुग्णांना गरजेनुसार, दोन तर काहींना एक अशा स्वरुपात औषधे घ्यावी लागतील. कंपनी ’डीएनए एडिटिंग टूल’वर काम करत आहे. ज्याद्वारे अनुवांशिक आजारांना बदलता येईल. याची चाचणी माकडांवर करण्यात आलेली आहे. त्यांच्या ‘डीएनए’तील बदल केल्यानंतर दोन आठवड्यातच त्यांच्या शरीरातील ‘कोलेस्ट्रॉल’ची पातळी ५९ टक्क्यांनी कमी झालेली आढळली आहे. त्यानंतर सलग सहा महिन्यांपर्यंत ही पातळी कायम राहिल्याचे आढळले. त्याच पद्धतीनुसार, आता मानवी शरीरावर याची चाचणी करण्याची परवानगी मिळाल्यास तर पुढील कार्यवाही करता येईल. दरम्यान, याबद्दल ठोस अशाप्रकारे संशोधनाला अवकाश आहे. चाचणीचे फायदे आहेत, तसे धोकेही संभवतील म्हणून डॉक्टरही या पर्यायाबद्दल साशंक दिसत आहेत. परंतु, अशा प्रकारच्या संशोधनाद्वारे जर मोठ्या एका रुग्णगटाचा फायदा होणार असेल, तर ही जोखीम स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@