मुंबई(प्रतिनिधी): उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या नागरिकांना हवामान खात्याने दिलासा देणारी . भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार, यावेळी मान्सून देशात वेळेआधीच दाखल होऊ शकतो. यंदा मान्सून २० मे नंतर कधीही केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ असनीचा प्रभाव मान्सून वर पडला आहे. यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनचा प्रवाह मजबूत होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
साधारणपणे केरळमध्ये १ जून ला दाखल झाल्यापासून देशात मान्सून सुरू होतो. पुणे येथे विकसित केलेल्या मल्टी-मॉडल विस्तारित श्रेणी अंदाज प्रणाली वापरून हे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.