वाराणसी : ज्ञानवापी मशिदी मध्ये सुरू करण्यात आलेले व्हिडिओ सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्यांना कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. हे सर्वेक्षण १७ मे पर्यंत पूर्ण करा असे आदेश वाराणसी कोर्टाने गुरुवारी दिले आहेत. या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या सर्वेक्षण अधिकाऱ्याला हटवण्यास देखील न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणी नेमल्या गेलेल्या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत हे सर्वेक्षण थांबवले जाणार नाही असे कोर्टाने गुरुवारी स्पष्ट केले आहे. या सर्वेक्षणास विरोध करणाऱ्या मशीद व्यवस्थापनास यामुळे जोरदार दणका मिळाला आहे.
काशी विश्वेश्वराच्या मंदिरासमोर असलेल्या ज्ञानवापी मशिदीचं आवारात असलेली शृंगार गौरी आणि इतर देवी देवतांच्या मूर्तींची पूजा अर्चा करण्यासाठी दाखल केल्या गेलेल्या याचिकेनंतर वाराणसी कोर्टाने या मशिदीचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. पण मशीद व्यवस्थापनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हे काम थांबले होते. या सर्वेक्षणासाठी मशिदीच्या आतील भागाचेही सर्वेक्षण करणे भाग होते पण मशीद व्यवस्थापनाने याच गोष्टीला विरोध केला होता. याच थांबलेल्या सर्वेक्षणाच्या बाबतीत आता न्यायालयाने निकाल दिला आहे. आता हे सर्वेक्षण पूर्ण होण्यास कुठलीही अडचण येणार नाही.
कशी विश्वेश्वराचे देऊळ पडून या जागी औरंजेबाने मशीद उभारली होती. याच मुद्यावरून आता हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच कारणामुळे य मशिदीच्या आवारातल्या देवी- देवतांच्या मूर्तींची पूजा अर्चा करण्याची परवानगी मागितली गेली होती याच वरून हा वाद पुन्हा समोर आला आहे.