मुंबई: वकील गुणरत्न सदवार्तेना गावदेवी पोलिसांनी सदावर्ते यांना ११० अंतर्गत नोटीस पाठवली आहे. याच नोटीसीनंतर सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'सत्तेचा कितीही दुरुपयोग करा, जय श्रीराम म्हणणारे आणि जय भीम म्हणणारे आम्ही तुम्हाला घाबरणार नाही. डंके की चोट पर उत्तर देऊ', असा इशाराच त्यांनी सरकारला दिला.
नुकतेच जेल भोगून आलेले वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिस पुन्हा एकदा त्यांची चौकशी करणार आहेत. गुणरत्न सदावर्ते अटकेत असताना त्यांच्याविरोधात गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे गावदेवी पोलिस सदावर्तेंची पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत. पोलिसांनी सदावर्ते यांना ११० अंतर्गत नोटीस देखील पाठवली आहे. याच नोटीसीनंतर सदावर्तेंनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा ठाकरे सरकारला लक्ष्य केलं.
'सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे'
"ही नोटीस म्हणजे, सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकारल्याचं द्योतक आहे. आम्हाला घटनेने दिलेलं स्वातंत्र्य आणि संविधानिक हक्क सरकार अशा प्रकारे हिरावून घेऊ शकत नाही. आमच्या हक्काला तुम्ही पायदळी तुडवू शकत नाही. त्यामुळे कायदेशीर बाबींना आम्ही डंके की चोट पर उत्तर देऊ", अशी आक्रमक प्रतिक्रिया सदावर्ते यांनी दिली.
सत्तेचा कितीही दुरुपयोग करा, घाबरणार नाही
सदावर्ते म्हणाले, "सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा कितीही दुरुपयोग करावा. आम्ही घाबरणार नाही. आमच्या आक्रमक भूमिकांमुळे पोलिसांनी आज आम्हाला पुन्हा नोटीस दिली. पण पोलिसांच्या कारवाईला आम्ही कधीच घाबरलो नाही, इथून पुढेही घाबरणार नाही