शास्त्रज्ञांना सापडला 'प्लास्टिक-पूरक बॅक्टेरिया'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2022   
Total Views |
plastic
 
 
 
वॉशिंग्टन: शास्त्रज्ञांनी एक नवीन प्रकारचा 'प्लास्टिक-पूरक जीवाणू' शोधून काढला आहे. हा जीवाणू खोल समुद्रात असलेल्या प्लॅस्टिकला चिकटतो आणि त्याचे विघटन सोपे करतो. या संशोधनाचे निष्कर्ष 'एन्व्हायरोनमेंट पोलुशन' या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 'न्यूकॅसल युनिव्हर्सिटी'च्या संशोधकांनी हा शोध लावला आहे.
 
 
समुद्रातील प्लॅस्टिक-पूरक जिवाणू एकूण जिवाणू समुदायापैकी फक्त एक टक्के आहेत. हे जीवाणू केवळ प्लास्टिकला चिकटून राहतात. संशोधनात असे दिसून आले आहे की हे जीवाणू प्लॅस्टिकला जोडले जाऊन खोल समुद्र ओलांडून 'हिचहाइक' करू शकतात. त्याच बरोबर हे जीव वेगळ्या वातावरणात सूक्ष्मजीव 'कनेक्टिव्हिटी' वाढवू शकतात. 'न्यूकॅसल युनिव्हर्सिटी'च्या 'स्कूल ऑफ नॅचरल अँड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस'चे पीएचडी विद्यार्थी 'मॅक्स केली' यांच्या नेतृत्वात या संशोधनाचे नेतृत्व करण्यात आले. "खोल समुद्र ही पृथ्वीवरील सर्वात मोठी परिसंस्था आहे आणि बहुसंख्य प्लॅस्टिक सागरी वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
प्लॅस्टिकला चिकटून राहू शकणार्‍या जिवाणू समुदायाचे विश्लेषण करण्याचे काम या विषयातील तज्ञ, अभियंते आणि सागरी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांकडून सुरू आहे. या मुळे खोल समुद्रातील प्लास्टिकचे अंतिम भवितव्यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
@@AUTHORINFO_V1@@