नवी दिल्ली: आशियाई विकास बँकेने जाहीर केलेल्या 'एशियन डेवलपमेंट आउटलूक' २०२२ या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर २०२२ मध्ये ७.५ टक्के इतका राहील असा अंदाज व्यवक्त केला आहे. तर २०२३ य वर्षासाठी तो ८ टक्के इतका असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. बँकेची 'मल्टी-लॅटरल फंडिंग एजन्सी' ने हा अहवाल प्रस्तुत केला आहे.
याच अहवालात दक्षिण आशियाई देशांसाठी एकत्रित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व देशांचा एकत्रित विकासदर हा ७ टक्के इतका राहील असे या अहवालात म्हटले आहे. या देशांमध्ये सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताची अर्थव्यवस्था जरी मजबूत स्थितीत राहणार असली तरी आपला शेजारील देश पाकिस्तानची अर्थव्यवस्था मात्र ४ टक्के इतकी कमी वेगाने वाढणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.