महाराष्ट्रातील नद्यांचा लवकरच कायापालट कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी, मुळा मुठा या नद्यांसाठी 1182.86 कोटी मंजूर

जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

    06-Apr-2022
Total Views | 97

river 
 
 
 
मुंबई  (प्रतिनिधी): राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (एनआरसीपी), महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी, एकूण 1182.86 कोटी रुपये खर्चाचे प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचा हिस्सा म्हणून 208.95 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच, कराड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि प्रकाशा या शहरांमध्ये आतापर्यंत प्रतिदिन 260 दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी प्रक्रिया क्षमता निर्माण करण्यात आली आहे. जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
  
जलशक्ती मंत्रालय राष्ट्रीय नदी संवर्धन योजना (एनआरसीपी) या केंद्र पुरस्कृत योजनेद्वारे, गंगा नदी आणि तिच्या उपनद्या वगळता नद्यांच्या निश्चित केलेल्या भागांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना पूरक सहाय्य करत आहे, हे ‘नमामि गंगे’ कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या वाटणीच्या आधारावर समाविष्ट आहे. एनआरसीपी अंतर्गत वेळोवेळी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेले ,प्रदूषण कमी करण्याच्या कामांच्या विचारार्थ प्रस्ताव हे त्यांचे प्राधान्यक्रम, एनआरसीपीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन, स्वतंत्र मूल्यांकन, योजना निधीची उपलब्धता इत्यादींच्या आधारे मंजूर केले जातात.
 
शहरे/नगरांमधून प्रक्रिया न केलेले किंवा अंशतः प्रक्रिया केलेले सांडपाणी आणि त्यांच्या संबंधित पाणलोट क्षेत्रात औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे त्याचप्रमाणे सांडपाणी/सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे संचालन आणि देखभाल करताना उद्भवणार्‍या समस्या, शेतीचे प्रवाह, विरलीकरणाचा अभाव आणि प्रदूषण करणारे इतर स्रोत. यामुळे देशातील नद्या प्रामुख्याने प्रदूषित होतात. प्रदूषण रोखण्यासाठी आणि नियंत्रणाच्या दृष्टीने, सांडपाणी हे जलस्रोतांमध्ये किंवा जमिनीत सोडण्यापूर्वी, सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाण्यावर आवश्यक प्रक्रिया सुनिश्चित करणे ही राज्ये/केंद्रशासित प्रदेश, स्थानिक स्वराज्य संस्था आणि औद्योगिक कंपन्यांची जबाबदारी आहे.
 
नद्यांची स्वच्छता/पुनरुज्जीवन ही एक निरंतर चालणारी आणि गतिमान प्रक्रिया आहे आणि ती नैसर्गिक घटकांवरही अवलंबून असू शकते. मूळ अर्ज क्रमांक 673/2018 मधील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांचे पालन करून देशातील प्रदूषित नद्यांच्या भागांबाबत, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील उर्वरित भाग प्रदूषणमुक्त करून पुनर्संचयित करण्यासाठी कृती योजनेची निर्धारित वेळेत अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121