मुंबई : सध्या सोशल मीडियावर शिवसेना महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये त्या बोलताना दिसत आहे की, “हो, तो कागद मी कुणाच्या हाताला लागू नये म्हणून गिळला”
किशोरी पेडणेकर नुकत्याच पार पडलेल्या 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात उपस्थित होत्या. यावेळी किशोरी ताईंनी ही जाहिर कबुली दिली. ‘तुमच्यासाठी आम्ही एक सप्राईज प्लान केला आहे,’ असे या व्हिडिओच्या सुरुवातीला संकर्षण कऱ्हाडे किशोरी पेडणेकर यांना म्हणतो. त्यानंतर या मंचावर त्यांचे पतीच सरप्राईज एंट्री घेतात. हे पाहून किशोरी ताईंचा आनंद गगनात मावेनासा होतो. किशोरी ताई म्हणतात की, ‘लव्ह मॅरेजपासूनची ही वर्ष आणि याच्यानंतरची वर्ष म्हणजे माझं हे मोठं सरप्राईज. मी पिठ मळत असताना आमचा जो मध्यस्थी करणारा होता, तो एक चिठ्ठी घेऊन आला आणि देता-देता ती खाली पडली आणि मी पिठ मळत होते. आणि माझे सगळे भाऊ समोर बसले होते. त्यातल्या एकाने हे पाहिलं. की, काहीतरी त्याने दिलयं. तो विचारला येणार इतक्यात मी ती चिठ्ठी खाऊन टाकली.’
या व्हिडिओनंतर हे स्पष्ट झाले की, हा कागद म्हणजे एक लव्हलेटर आहे. हा धमाल किस्सा किशोरी ताईंनी झी मराठीच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात सांगितला आहे. ही सगळी धमाल आपल्याला लवकरच झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात पाहायला मिळेल.