जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी उरली फक्त ३ वर्ष

"आयपीसीसी"च्या अहवालातून जागतिक इशारा

    05-Apr-2022
Total Views | 78
 
Climate
 
मुंबई (प्रतिनिधी): संयुक्त राष्ट्रांची हवामान संस्था असलेल्या 'इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज' (आयपीसीसी) ने नुकताच त्यांचा जागतिक हवामान बदलासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये 'आयपीसीसी'ने जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी फक्त तीनच वर्षं उरली असल्याचा इशारा दिला आहे. 'आयपीसीसी'च्या या अहवालात जागतिक तापमानवाढ थांबवण्यासाठी अनेकविध उपाययोजनाही सूचविल्या आहेत.
मागील दशकातील सरासरी वार्षिक हरितवायू ('ग्रीन हाऊस गॅस') उत्सर्जन हे पूर्वीच्या कोणत्याही दशकाहून अधिक असल्याचे देखील या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच सर्व औद्योगिक आणि निम औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रदूषणकारी उत्सर्जन तत्काळ कमी केल्याशिवाय १.५ अंश सेल्सिअसच्या वर जागतिक तापमानवाढ रोखणे आवाक्याबाहेर असल्याचेही 'आयपीसीसी'ने आपल्या अहवालात म्हटले आहे.
सदर अहवालात जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी ऊर्जा, बांधकाम, वाहतूक, भूमी आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमधील उपाययोजनांची संपूर्ण यादीदेखील 'आयपीसीसी'कडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. जागतिक तापमानवाढ कमी करण्याच्या प्रभावी पद्धती उपलब्ध असून त्या व्यवहार्य आणि परवडणाऱ्यादेखील आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी विविध उपाययोजना 'आयपीसीसी'ने आपल्या अहवालात निदर्शनास आणून दिल्या आहेत.
उदाहरणार्थ, कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्यासाठी प्रति टन १०० डॉलरपेक्षा कमी किंमत असलेल्या पर्यायांद्वारे कार्बन उत्सर्जनाची पातळी निम्म्यावर आणली जाऊ शकते आणि यासंदर्भात प्रगती होत असल्याचे 'आयपीसीसी' ने मान्य केले आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणारी धोरणे आणि कायद्यांचा सातत्यपूर्ण जागतिक विस्तार झाल्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी झाले असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
टिंगल करणारा कलाकार विनोदी कलाकार असुच शकत नाही... कुणाल कामराच्या विरोधात अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंनी मांडली भूमिका!

टिंगल करणारा कलाकार विनोदी कलाकार असुच शकत नाही... कुणाल कामराच्या विरोधात अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंनी मांडली भूमिका!

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं आहे. मात्र, अद्याप त्याने हजेरी लावलेली नाही. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी स्टँडअप कॉमेडी आणि या वादावर प्रतिक्रिया दिली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121