भिवा पुणेकरांची ‘कॉस्मिक रंग पॉवर’

    30-Apr-2022
Total Views | 76

विविधा
 
 
 
कलाकराची कलाकृती ही त्याच्या अंतर्मनातील एक हुंकार असते. अंतर्मन, मन, स्वभाव, विचार, कल्पना या सर्व गोष्टी अनुभवावरच जाणता येतात. या गोष्टी दृश्यस्वरुपात व्यक्त व्हाव्यात, असे वाटत असेल, तर रंग-आकार यांच्याच मदतीने आपण पाहू शकतो. हे काम चित्रकार भिवा पुणेकर यांनी साधले आहे.
 
 
 
कलाकृतीलामूर्तस्वरुपात व्यक्त होण्यासाठी मनन, चिंतन, कल्पना आणि अभिव्यक्ती यांच्या सहवासातून जावे लागते. मूर्त स्वरुपात व्यक्त होण्यापूर्वी ती कलाकृती कलाकाराच्या मनामध्ये निर्माण होत असते. कलाकार ती कलाकृती आपल्या अंत:चक्षूंनी बघत असतो, जेव्हा ती कलाकृती मूर्तस्वरुपात प्रकट होते, तेव्हा ती रसिक मनाचा ठाव घेतेच घेते. प्रयोगशील चित्रकार भिवा पुणेकर यांच्या कलाकृती पाहताना असाच अनुभव येतो. एका ‘बिंदू’ला केंद्रस्थानी मानून त्यांनी बर्‍याच कलाकृती साकारल्या आहेत.पंचमहाभूतांपैकी एका शक्तिस्थळाला ‘बिंदू’ने ओळखले जाते. उर्जेचा स्रोत हा बिंदू आहे. प्रकृती व पुरुष हे बिंदूच्या माध्यमातून एकत्र येतात. वैश्विक ऊर्जा-उत्पत्ती स्थळ म्हणून अध्यात्मशास्त्रात ‘बिंदू’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातल्या कुठल्याही आकाराची निर्मिती ही एका ‘बिंदू’पासूनच झालेली आहे. आपले सप्तचक्र विशेषत: ‘आज्ञाचक्र’ आणि ‘मूलाधारचक्र्र’ अर्थात ‘कुंडलिनीचक्र’ यांना साधनेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे जाणकार सांगतात. चित्रकार भिवा पुणेकर यांच्या बर्‍याच कलाकृती या ‘बिंदू’पासून निर्माण झालेल्या दिसतात.
 
 
 
आपल्या हिंदू संस्कृतीत ‘बिंदू’चा उपयोग एकाग्रता मिळविण्यासाठी केला जातो. बर्‍याचदा एकाग्रता लाभण्यासाठी भिंतीवर ‘आयलेव्हल’ला बिंदू काढून त्याकडे पाहण्यास सांगितले जाते. एकाग्रता प्राप्त होण्यासाठी कलाकाराला सतत आणि सातत्याने ‘रियाज’ करावा लागतो. एकाग्रता प्राप्त झाली की, व्यक्ती प्रगल्भ होऊ लागते. चित्रकाराच्या दुनियेत हीच प्रगल्भता त्यांच्या कलाकृतीतून व्यक्त होते. मग ती व्यक्तता रंगांच्या मार्फत होते किंवा आकारांच्याद्वारे व्यक्त होते. बर्‍याचदा अशी प्रगल्भता ही रंग आणि आकारांच्याद्वारे व्यक्त होत असते. चित्रकार, भिवा पुणेकर यांच्या रंगाकारांच्या रचनांतील सहयोग प्रगल्भतेकडे नेणारा दिसतो, म्हणून त्यांचे प्रत्येक या विषयावरील ‘पेंटिंग’ हे रसिकमनाला दिड्.मूढ करते. त्यांच्या कलाकृती पाहताना ‘पद्मभूषण’ चित्रकार एस. एस. रझा यांच्या कलाकृतींची आठवण येते. मात्र, दोघांची रंगलेपन शैली अतिशय भिन्न वाटते.
 
 
 
विविधाज
 
 
 
कलाकराची कलाकृती ही त्याच्या अंतर्मनातील एक हुंकार असते. अंतर्मन, मन, स्वभाव, विचार, कल्पना या सर्व गोष्टी अनुभवावरच जाणता येतात. या गोष्टी दृश्यस्वरुपात व्यक्त व्हाव्यात, असे वाटत असेल, तर रंग-आकार यांच्याच मदतीने आपण पाहू शकतो. हे काम चित्रकार भिवा पुणेकर यांनी साधले आहे. त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, चंद्रकोर आणि बिंदू या पाच आकारांमध्ये पंचमहाभूते बद्ध केलेली आहेत. या पंचमहाभूतांनीच आपले शरीर बनलेले आहे. त्याच पंचमहाभूतांना समोर ठेवून भिवा पुणेकर यांनी त्यांच्या बव्हंशी कलाकृती साकारलेल्या आहेत, असे दिसते. लाल, पिवळा, निळा, पांढरा आणि काळा या मुख्य विशुद्ध रंगांचा उपयोग करून पुणेकरांच्या कलाकृती सौंदर्यवान बनलेल्या आहेत. रंगलेपनातील त्यांची शैली ही त्यांची स्वतःचीच भासते. भौमितिकतेचाही त्यांनी चपखलपणे उपयोग करून त्यांच्या कलाकृतींद्वारे स्वयंशिस्तीचा कानमंत्र दिलेला असावा. रंगलेपनातील त्यांचे कौशल्य हे वादातीत आहे. त्यांच्या काही कलाकृती या ‘फिगरेटिव्ह’ आहेत. त्यातही त्यांनी पौराणिकता आणि धार्मिकतेचा आधार घेतलेलादिसतो. धार्मिक व पौराणिक संदर्भ घेऊन आधुनिक सामाजिक संबंध दर्शविण्याची त्यांची शैली अद्भुततेचा आभास निर्माण करते.
 
 
विविधाज ब
 
 
 
सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयातून ‘एटीडी’ आणि ‘जी. डी. आर्ट’ (पेंटिंग) चे कला शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मुंबईच्या ‘सर जे. जे. स्कूल’मधून त्यांनी ‘डीप.ए.एड’चे पदविका शिक्षण पूर्ण केले. ऑईल, अ‍ॅक्रॅलिक, पेन्सिल, इंक मिश्रमीडिया आणि चारकोल रंग या रंगांमधून त्यांनी कलाकृती साकारण्यामध्ये हुकूमत प्राप्त केलेली दिसते. अनेक प्रदर्शने आणि विविध स्तरांवरील पुरस्कार मिळविलेल्या चित्रकार भिवा पुणेकर यांच्या कलाकृती विविध मान्यवर संग्राहकांच्या संग्रही आहेत. प्रचलित दैनंदिन जीवन, राहणीमान वा संबंधित प्रचलित निरीक्षणांवर त्यांच्या कलाकृती शक्यतो आढळत नाहीत. आध्यात्मिक गतीवर आधारित आणि ’कॉस्मिक पॉवर’वर आकारबद्ध झालेल्या कलाकृती, त्यात रमणारे चित्रकार भिवा पुणेकर म्हणजे, भारतीय सांस्कृतिकतेचे एक दृश्यचित्रणात्मक अभ्यासक वाटतात. प्रगल्भ विचार, रंगांची आकर्षक रचना आणि आकारांची चपखलता या त्रिसूत्रांनी युक्त प्रत्येक कलाकृती या वास्तू सजावटीसाठी अत्यंत उपयुक्त वाटतात. त्यांच्या कलाप्रवासाला शुभेच्छांसह सदिच्छा...!
 
 
प्रा. डाॅ. गजानन शेपाळ
८१०८०४०२१३
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121