नवी दिल्ली: कोरोना साथीच्या जबरदस्त धक्क्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आता हळू हळू पूर्वपदावर येते आहे असे चित्र निर्माण होते आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालातील माहितीनुसार या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्च महिन्यात देशातील बेरोजगारी घातली आहे. फेब्रुवारी महिन्यातील ८.१० टक्क्यांवरून आता बेरोजगारीचा दर मार्च महिन्यात ७.६ टक्त्यांवर येऊन पोहोचला आहे. शहरी बेरोजगारीचा दरसुद्धा ८.५ टक्क्यांवर तर ग्रामीण बेरोजगारीचा दर हा ७.१ टक्त्यांवर आला आहे.
२६.७ टक्के बेरोजगारीसह हरयाणा हे देशातील सर्वात जास्त बेरोजगारी असलेले राज्य ठरले आहे. त्याच्यानंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर यांचा २५ टक्के बेरोजगारीसह संयुक्त दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर बिहार, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्यांचे क्रमांक लागतात. कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये १.८ टक्क्यांसह सर्वात कमी बेरोजगारी दर नोंदवला आहे.