नाशिक : “ ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण क्षेत्रासाठी उद्योग निर्माण करण्यास चालना दिली गेली. संरक्षण क्षेत्रात उद्योगांना गगनभरारी घेता यावी यासाठी केंद्र सरकारने सर्वच सुविधांची मांदियाळी उद्योजकांना निर्माण करून दिली, तसेच कार्यात पारदर्शकता आणण्याचे मोठे काम केंद्र सरकारने केले आहे,” असे प्रतिपादन ‘एमएसएमई’ चे सदस्य तथा भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी केले. याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकार मार्फत सुरू असलेल्या संरक्षण क्षेत्रातील उद्योग विकासाच्या धोरणाची सोदाहरण मांडणी उपस्थितांसमोर विषद केली.
ते ‘लघु उद्योग भारती’ नाशिक शाखेतर्फे आयोजित स्नेहसंमेलन प्रसंगी ‘संरक्षण क्षेत्रातील उद्योगांच्या संधी’ या विषयावर बोलत होते.यावेळी ‘लघु उद्योग भारती’चे अध्यक्ष विवेक कुलकर्णी, कार्यवाह निखिल तापडिया, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री भूषण मर्दे, सहमंत्री मारुती कुलकर्णी, एमआयडीसी नाशिकचे अधिकारी नितीन गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पेशकार म्हणाले की, “राज्यात व केंद्रात सत्ता नसताना संस्थेची स्थापना झाली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून लघु उद्योजकांचे योगदान देशाला समजू लागले. लघु उद्योजकांना आवश्यक असणारी संधी आजवर समोर येत नव्हती.” मात्र, केंद्रात भाजपची सत्ता आल्याने लघु उद्योजकांना अनेकविध संधी निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ‘मेक इन इंडिया’ हे भारतीय उद्योजकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरले असून त्याचीच पुढची पायरी ‘आत्मनिर्भर भारत’ असल्याचे ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारने एकाच छत्राखाली कशाप्रकारे संरक्षण क्षेत्रातील विविध विभागांची माहिती उपलब्ध करून दिली आहे, याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारमार्फत देशातील सर्वच स्थरातील उद्योजकांसाठी असलेल्या विविध उपाययोजना, आर्थिक तरतुदी, विक्री व्यवस्था, विपणन व इतर सर्वच अनुषंगिक सोयीसुविधांची माहिती उपस्थित उद्योजकांना दिली. केंद्र सरकारचा (पान 6 वर)केंद्र सरकारने सर्वच सुविधांची मांदियाळी उद्योजकांना निर्माण करून दिली (पान 1 वरुन) असलेला दूरदृष्टीने हा भारताच्या जागतिक विकासासाठी मैलाचा दगड ठरत असल्याचे पेशकार यांनी यावेळी सांगितले. यावेळी मारुती कुलकर्णी म्हणाले की, लघु उद्योग भरतील आजवर सर्वच सदस्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. मागील 25 वर्षात प्रत्येक अध्यक्षांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी भूषण मर्दे म्हणाले की, देशाच्या आर्थिक क्षेत्रात लघु उद्योजकांचे योगदान हे कायम मोलाचे ठरले आहे. देशातील लघु उद्योजकांना आगामी काळात अनेक मोठ्या संधी असल्याचे त्यांनी यावेळी संगीतले. देशाच्या अर्थव्यवस्थेत अधिकाधिक योगदान देण्यासाठी उद्योजकांनी विचार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केली. लघु उद्योग भारती कायम सकारत्मक विचारानेच शासनाशी संवाद साधत असते त्यामुळे अनेक बदल घडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विवेक कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्र उद्धरासाठी लघु उद्योग भारतीचे कायमच योगदान राहिलेले आहे. नाशिक मध्ये 1998 पासून आतापर्यंत लघु उद्योग भारतीने अनेक बेंच मार्क स्थापन केले आल्याचे ते यावेळी म्हणाले.