मुंबई: " राज्यात जाती- जातींमध्ये फूट पडून द्वेषाची भावना वाढवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कामच आहे" अशा शब्दांत भाजप आ. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांच्या विधानांचे काहीच वाटले नाही कारण शरद पवार गेले ४० वर्षे हेच राजकारण करत आलेले आहेत, अमोल मिटकरी त्यांचीच भाषा बोलत आहेत अशी अमोल मिटकरी यांच्यावर त्यांनी टीका केली.
महाराष्ट्रात जातीयवादाला खतपाणी राष्ट्रवादी काँग्रेसनेच घातले आहे, जाती- जातींमध्ये फूट पडून आपणच त्यांचे एकमेव तारणहार आहोत असे त्या त्या समाजांवर ठसवायचे हेच राजकरण शरद पवार करतात. त्यामुळे त्यांनी प्रत्येक जातीतला नेता आपल्या पक्षात घेतला आहे. त्यातून पाहिजे तितका भ्रष्टाचार करता येतो हेच पवारांचे काम असल्याचा गंभीर आरोपही सदाभाऊंनी केला.