पुणे: माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे सोमवारी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. बाबरी मशीद घटनेवेळी ते केंद्रीय गृहसचिव होते. या घटनेनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गृह खात्याबरोबर पेट्रोलियम तसेच अर्थ मंत्रालयाचे सचिव पदही भूषवले होते. महाराष्ट्र विद्युत मंडळाचे ते अध्यक्षही होते.
सेवानिवूत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये लिखाण केले. मुंबई विद्यापीठातून पीएचडी पदवी, मॅसॅच्युएट्स विद्यापीठातून अर्थशास्त्रातील एमए या पदव्या मिळवल्या होत्या. राष्ट्रीय राजकारणासंबंधित २० पुस्तकांचे ते लेखक होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि परिवार आहे.