शाळेत बायबल घेऊन येणे बंधनकारक! मिशनरी स्कुलमधील प्रकार

    25-Apr-2022
Total Views | 84
 karnatak
 
 
 
बंगळुरू: कर्नाटकात उफाळलेला हिजाब वाद नुकताच शमला असताना आता नव्याच एका वादाने डोके वर काढले आहे. बंगळुरू मंधील एका शाळेने मुलांना शाळेत बायबल घेऊन येण्यास मनाई करणार नाही असे पत्र पालकांकडून लिहून घेतले असल्याची माहिती उघड झाली आहे.



हिंदू जगजागृती समितेचे प्रवक्ते गौडा यांनी असा आरोप केला की "क्लेरन्स हाय स्कूल मुलांना शाळेत बायबल घेऊन येणे बंधनकारक करत आहे, हे कलम संविधानाच्या कलम २५ आणि ३० नुसार मिळणाऱ्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे." या बातमीने कर्नाटकात एकाच खळबळ उडवून दिली आहे.
 
 
 
 
दरम्यान क्लेरन्स हाय स्कूलचे मुख्याध्यापक जेरी जॉर्ज मॅथ्यू यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, " आम्हाला कल्पना आहे की आमच्या शाळेच्या काही नियमांमुळे काही पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आम्ही कुठलाही कायदा मोडणार नाही, आम्ही कायद्याचे पालक आणि शांतताप्रिय लोक आहोत."
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121