संघ स्वयंसेवक श्रीनिवासन यांच्या हत्येमागे 'पीएफआय'चा हात!

    25-Apr-2022
Total Views | 72

Shrinivasan
 
 
 
तिरुवनंतपुरम : केरळच्या पलक्कड जिल्ह्यात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एसके श्रीनिवासन (४५) या स्वयंसेवकाची शनिवारी (दि. १६ एप्रिल) रोजी हत्या करण्यात आली होती. त्याच्याशी संबंधित ७ आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून सोमावार, दि. २५ एप्रिल रोजी आणखी दोन आरोपींना अटक केल्याचे उघड झाले आहे. यातले बहुतांश आरोपी हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याची राजकीय शाखा असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चे कार्यकर्ते असल्याचे स्थानिक पोलिसांयाकडून सांगण्यात येत आहे.
 
 
 
अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय सखारे यांनी म्हटले की, "अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचा १६ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात थेट सहभाग होता. पोलिसांनी श्रीनिवासन यांच्या हत्येचा कट रचणारा व्यक्ती, हत्येमागचा सूत्रधार अशा सर्वांची ओळख पटली असून लवकरच आणखी काही जणांना अटक करण्यात येईल."
 
 
 
"साधारण १४ ते १५ जणांचा यात सहभाग होता. त्यांनी यापूर्वीही दोन अन्य संघ स्वयंसेवकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात अयशस्वी ठरल्याने त्यांनी श्रीनिवासन यांना लक्षकेंद्रित केले. श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याची राजकीय शाखा असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चे कार्यकर्ते आहेत.", असेही ते पुढे म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121