गडचिरोलीचा ‘स्मार्ट’ शेतकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2022   
Total Views |
 

sd
 
 
2018 साली महाराष्ट्र सरकारचा वनवासी विकास विभाग आणि मुंबई विद्यापीठाने तत्कालीन ‘वनहक्क कायद्यां’तर्गत मंजूर केलेल्या ग्रामसभांच्या सदस्यांसाठी 25 आठवड्यांचा एक अभ्यासक‘म राबविला होता. या उपक‘माचे नाव होते 'सामूहिक वनसंपत्ती अभ्यासक्रम' या उपक्मारमामध्ये ‘वनहक्क’ कायद्याचे केवळ बारीकसारीक पैलूच नव्हे, तर भारतातील वनवासींच्या इतिहासापासून ते व्यावहारिक लेखन आणि ‘जीएसटी’पर्यंत अनेक संबंधित विषयांचा समावेश होता. कायद्यानुसार नियमांचे पालन करून वन संसाधन व्यवस्थापन आराखडा कसा तयार करावा, याचे धडेही सहभागींना दिले गेले. तसेच, जंगलात सापडणारे गौण वनउपज, त्याचबरोबर विपणन, लेखा, सािं‘यकी, स्टॉक-टेकिंग, लँडस्केपिंग इत्यादींसह विविध विषयांतील ‘यातनाम व्यावसायिक आणि शिक्षकांची व्या‘यानेदेखील आयोजित करण्यात आली होती. या उपक‘मात हौशी सदुरामनेही आवर्जून हजेरी लावली. याच उपक‘मातून मिळालेले ज्ञान आणि उपजत संशोधनवृत्तीमुळेच सदुरामने एका दुर्मीळ वनऔषधीची प्रथमच महाराष्ट्रात नोंद केली. ही वनऔषधी म्हणजे ’जीओडोरम लॅक्सिफ्लोरम’. इतकेच नव्हे, तर गडचिरोली विज्ञान ’हाविद्यााच्या प्राध्यापकांसह याबद्दलचा शोधनिबंधही ’जर्नल ऑफ थ‘ेटन्ड टॅक्सा’ मध्ये फेब‘ुवारी 2022 रोजी प्रकाशित झाला आहे.
 
 
 
gd3
 
 
’जीओडोरम लॅक्सिफ्लोरम’ ही वनस्पती साधारण जून-जुलै दरम्यान बहरते. 2019 साली आपल्या गावाजवळच्या सड्यावर जंगलात फेरफटका मारण्यासाठी सदुराम गेला असता, त्याला ही दुर्मीळ वनस्पती आढळली. पण, तेव्हा या वनस्पतीची नेमकी ओळख सदुरामलाही माहिती नव्हती. मग सदुरामने या विषयातील जाणकारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याकडूनही योग्य प्रतिसाद त्याला मिळाला नाही. त्यानंतर गडचिरोलीमधील विज्ञान महाविद्यालयाचे मुख्याधापक सय्यद अब्रार यांच्या मार्गदर्शनाने सदुरामला या वनस्पतीची ओळख पटली. पुढे सदुरामने या वनऔषधीवर शोधनिबंध लिहिला आणि तो फेब‘ुवारी महिन्यात ’जर्नल ऑफ थ्रेटंड टॅक्सा’मध्ये प्रकाशितही झाला. विशेष म्हणजे, या नोंदीमध्ये या वनस्पतीच्या गोंडी नावाचाही समावेश करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात या वनस्पतीचा वनवासी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपयोग केला जातो. खासकरून या वनऔषधीच्या फुलांचा, कंदाचा उपयोग जखमांवर लेप म्हणून केला जातो. शरीरावरील पिकलेल्या फोडांवर या वनऔषधीच्या कंदाची पेस्ट लावली की, आराम मिळत असल्याचे सदुराम सांगतो. ’जीओडोरम लॅक्सिफ्लोरम’ ही गौण वनउपज नसून एक दुर्मीळ वनस्पती म्हणून गणली जाते. बांबू, तेंदू, हिरडा, बेहडा, शतावरी, पळस, खोबारवेल आणि इतर गौण वनउपज बाजारात विकून वनवासी बांधव आपला उदरनिर्वाह करतात. याविषयी माहिती देताना सदुराम सांगतो की, पूर्वी लोकांनी हे वनउपज वेगवेगळे विकल्यामुळे फक्त पाच-सात किलो उपज विकले जात होते. पण, ‘गौण उपज/ वनहक्क’ कायद्याअंतर्गत राबविलेल्या उपक‘मामुळे आता तेच एक क्विंटलपर्यंत विकले जात आहे. भामरागडमध्ये आम्ही मोह-फुलाला 40 रुपये भाव मिळवून दिला, जो पूर्वी तालुक्यातील व्यापार्‍यांकडून केवळ 20-25 रुपये इतकाच देण्यात येत होता.’’
 
 
gd2
 
 
शेतकरी असण्याबरोबरच सदुराम हा ग्रा मपंचायतीतील जैवविविधता समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणूनही तितकाच सकि‘य आहे. त्याअंतर्गत सदुराम आणि ग्रा मस्थांतर्फे सध्या ’बीज बँक’ निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. दुर्मीळ वनस्पतींचे बीज संरक्षित व संवर्धित करणे हा या ’बीज बँके’चा मुख्य उद्देश. तसेच, वनसंपत्तीच्या संरक्षणार्थ जैवविविधता समितीने शेजारच्या काही गावांमधील सरपंचांशी चर्चा करून लोकसहभागातून लोकजैविविधता यादी (पीबीआर) तयार करण्याचे कामही सुरू केले आहे. एकदा ही यादी तयार झाली की, गाव मेळावा भरवून, त्याविषयीचे समग‘ ज्ञान गावकर्‍यांपर्यंत पोहोचविले जाईल. त्याचबरोबर गावातील पुढच्या पिढीनेही जंगलांचे संरक्षण व संवर्धन करावे, यासाठीही जैवविविधता समिती प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत विविध जनजागृतीपर उपक‘मांच्या माध्यमातून लहान मुलांचा पर्यावरण संरक्षणाच्या कामात सहभाग वाढविण्याचा समितीचा मानस आहे. खरंतर राज्यभरातील हजारो गावांना वनाधिकार देण्यात आले आहेत. परंतु, समाज आणि सरकारमधील
असमन्वयामुळे, सुसंवादाअभावी या वनहक्कांची आणि जबाबदारीची म्हणावी तेवढी जाणीव अद्याप वनवासींपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे ही दरी केवळ शिक्षणाच्या प्रचार-प्रसारानेच भरून काढता येऊ शकते. त्यासाठी वनवासी बांधवांना वनहक्कांसंबंधी तरतुदी आणि कायद्यांची पुरेपूर जाणीव करून देण्याची आज नितांत गरज आहे. कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि ज्ञान विकास हा या अभ्यासक‘माचा मूळ उद्देश. कारण, एकदा का वनवासी बांधव वनसंपत्तीचा शाश्वत वापर करायला शिकले, तर ते इतर पारंपरिक, सुरक्षित उपजीविका निर्माण करण्यास नक्कीच सक्षम होतील. सदुराम आणि त्यांच्या जैवविविधता समितीने यादृष्टीने योग्य ती पावले उचलली आहेतच. तेव्हा, अशा या विदर्भाच्या दुर्गम गावातील या वनवासी रामाच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच! सदुरामसारखेच आणखी ‘स्मार्ट’ संशोधक या गावात घडो, हीच यानिमित्ताने
सदिच्छा!

gl 
 
’जिओडोरम लॅक्सिफ्लोरम’ विषयी
’जिओडोरम लॅक्सिफ्लोरम’ ही वनस्पती सर्वप्रथम 1845 मध्ये ईशान्य भारतातून प्रथम नावारूपास आली आणि ’कोलकाता जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री’मध्ये जीवशास्त्र अभ्यासक गि‘फिथ यांनी त्याची तशी नोंदही केली आहे. त्यांनतर ईशान्य भारतातील या वनस्पतीच्या बर्‍याच नोंदी आढळतात. 2015 साली गुजरातमध्ये आणि 2018 मध्ये तेलंगणमध्येही या वनस्पतीची नोंद करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@