पूर्वेकडचं जिब्राल्टर पडतं तेव्हा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 

pm 
 
२०१५ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सिंगापूरला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी ‘एस्प्ल्नेड पार्क’या ठिकाणच्या ‘आझाद हिंद सेने’च्या युद्ध स्मारकाला आवर्जून भेट देऊन आदरांजली वाहिली होती. एक नवी परंपरा, नवा पायंडा पाडला होता. भारताच्या तोपर्यंतच्या कुणाही पंतप्रधानाने न केलेलं एक महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं होतं.
 
 
एप्रिल 2022च्या पहिल्या आठवड्यात भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी सिंगापूरला भेट दिली. सिंगापूरचे लष्कर प्रमुख संरक्षणमंत्री आणि अन्य नागरी नेत्यांची भेट घेऊन जनरल साहेबांनी भारत-सिंगापूर यांच्यातील संरक्षण धोरणासंदर्भात बातचीत केली. त्याचवेळी जनरल नरवणे यांनी ‘क्रांजी युद्ध स्मारक’ या ठिकाणाला आवर्जून भेट देऊन पुष्पचक्रासह आदरांजली वाहिली. क्रांजी (क्रांती नव्हे) हे सिंगापूरमधील एका वस्तीचं नाव आहे. इथे ब्रिटिश लष्कराची फार मोठी छावणी होती. दि. 8 फेबु्रवारी, 1942 या दिवशी जपानी सैन्याने सिंगापूरवर हल्ला चढवला. सात दिवस कजाखी झुंज देऊन अखेर दि. 15 फेबु्रवारी, 1942 ला सिंगापूर पडलं. या लढाईत इंग्रज, मलायी भारतीय आणि चिनी असे किमान 30 हजार सैनिक ठार झाले. त्यांची स्मृती म्हणून हे स्मारक उभं करण्यात आलं आहे. जनरल नरवण्यांनी तिथे भेट देऊन पुष्पचक्रासह आदरांजली वाहणं, हे संरक्षण दलांच्या परंपरेनुसार होतं.
 
 
 
या आधी 2015 साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सिंगापूरला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी ‘एस्प्ल्नेड पार्क’या ठिकाणच्या ‘आझाद हिंद सेने’च्या युद्ध स्मारकाला आवर्जून भेट देऊन आदरांजली वाहिली होती. एक नवी परंपरा, नवा पायंडा पाडला होता. भारताच्या तोपर्यंतच्या कुणाही पंतप्रधानाने न केलेलं एक महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं होतं.
 
 
 
भूमध्य समुद्र हा आफ्रिका आणि युरोप खंडाची सरहद्द आहे. भूमध्य समुद्राच्या दक्षिणेला आफ्रिका आणि उत्तरेला युरोप आहेत, तर त्याच्या पूर्व तटकावर आशिया खंड आहे. या आशिया खंडातल्या अरबस्तान म्हणजे आताच्या सौदी अरेबिया देशात इसवी सन 500 मध्ये प्रेषित महंमद यांचा जन्म झाला. इ. स. 613 मध्ये त्यांनी ‘इस्लाम’ या त्यांना आकळलेल्या एका नव्या तत्त्वज्ञानाचा प्रचार-प्रसार करायला सुरुवात केली. इ. स. 632 मध्ये महंमदांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या अनुयायांनी तलवार उपसली आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार जबरदस्तीने सुरू केला. पुढच्या 70 ते 80 वर्षांत अरबांनी भूमध्य समुद्राला लागून असलेली आफ्रिका खंडाची संपूर्ण किनारपट्टी जिंकली. भूमध्य समुद्राच्या अगदी पश्चिम टोकाला आफ्रिका आणि युरोप खंड अगदी एकमेकांच्या जवळ आहेत.
 
 
दोघांच्यामध्ये फक्त एक छोटीशी खाडी आणि त्या खाडीतलं एक चुनखडीचं भलंमोठं बेट आहे. इ. स. 710 या वर्षी अरब सेनापती तारीक-इब्न-झियाद हा ती खाडी ओलांडून त्या बेटावर उतरला आणि आपली तलवार पलीकडच्या युरोप खंडाच्या दिशेने रोखून त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिला, ‘आफ्रिका आटपली, आता युरोप!’ म्हणजे आफ्रिकेला इस्लाममय करून झालं, आता युरोपकडे वळा. या घटनेचं स्मरण म्हणून अरबांनी त्या बेटाला नाव दिलं- ‘जबल् -अल्-अत्त-तरीक’ म्हणजे तारीकचं बेट, तारीकचा खडक. याचाच हळूहळू अपभ्रंश होत जाऊन ते नाव रूढ झालं- ‘जिब्राल्टर’, ‘द रॉक ऑफ जिब्राल्टर.’
इसवी सनाच्या 16व्या शतकात आणि नंतर सर्व सागरी स्पर्धकांचा पाडाव करून ब्रिटन ही जेव्हा एकमेव ‘समुद्रस्वामिनी’ सागरी महासत्ता बनली, तेव्हा त्यांनी हर प्रयत्न करून हे जिब्राल्टरचं ठाणं आपल्या ताब्यात ठेवलं.
 
 
 
अगदी असाच प्रकार त्यांनी सिंगापूरबाबत केला. जगाचा किंवा आशिया खंडाचा नकाशा पाहा. हिंदी महासागराच्या ‘दक्षिण चिनी समुद्र’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या सागरी भागात मलेशिया देशाच्या अगदी दक्षिण टोकावर सिंगापूर वसलं आहे. भारताकडून इंडोनेशिया, चीन, जपान, तैवान किंवा पलीकडे पॅसिफिक महासागरात ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेकडे जाणार्‍या किंवा तिथून येणार्‍या प्रत्येक व्यापारी जहाजाला सिंगापूरच्या नाक्यावरून जाण्याखेरीज दुसरा मार्गच नाही. म्हणून तर इंडोनेशियात साम्राज्य स्थापन करणार्‍या श्रीविजय राजाने या ठिकाणी बंदर निर्माण केलं नि त्याला नाव दिलं - सिंहपूर! चीनकडून भारताकडे किंवा भारताकडून चीनकडे जाणार्‍या अनेक प्रवासी, व्यापारी, बौद्ध भिख्खू यांच्या प्रवासवर्णनांमध्ये सिंहपूरचा उल्लेख येतो. चंदनाच्या बहुमूल्य वृक्षांनी संपन्न असलेल्या मलयद्वीप म्हणजे आताच्या मलेशियाच्या दक्षिण टोकावरचं गजबजलेलं, समृद्ध, श्रीमंत पत्तन म्हणजेच बंदर सिंहपूर. त्याचाच अपभ्रंश झाला सिंगापूर.
 
 
 
आधुनिक काळात या आग्नेय आशियाई देशात इंग्रजांअगोदर पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच शिरले. या तीनही युरोपीय सत्तांनी आग्नेय आशियाई देशांची मनसोक्त लूट केली. 19व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे साधारण 1803 ते 1815 या काळात युरोपात इंग्रज आणि फे्रंच यांच्यात जुंपली. त्यात नेपोलियनचा कायमचा पाडाव करून इंग्रजांनी युरोपात बाजी मारली. मग ते आग्नेय आशियातलं फ्रेंच साम्राज्य जिंकून घेण्याच्या मागे लागले. सर टॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स या सेनापतीने 1819 साली सिंगापूर जिंकलं.
 
 
 
आता या ठिकाणी इंग्रजांची लबाडी पाहा. सिंगापूर हे शहर त्या ठिकाणी किमान सहाव्या शतकापासून होतंच. कारण, तसं सिद्ध करणारे शिलालेखच आहेत. पण, इंग्रज आणि त्यांचे चमचे बेधडक म्हणतात की, सिंगापूर शहर सर टॉमस रॅफल्स या इंग्रज सेनापतीने दि. 6 फेब्रुवारी, 1819 या दिवशी स्थापन केलं. त्याने जिंकलं, असं म्हणणं योग्य ठरेल. पण स्थापन केलं, असं कसं म्हणता येईल?
 
 
 
हेच मुंबईच्या बाबतीतही आहे. मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणण्यात अजूनही अभिमान मानणारे अनेक चमचे आजही आहेत. त्यांच्या मते मुंबईची स्थापना म्हणे दि. 8 मे, 1661 या दिवशी झाली का? तर म्हणे, पोर्तुगालच्या राजाने आपली बहीण इंग्लंडच्या राजाला दिली आणि आंदण म्हणून मुंबई बेट दिलं. हा करार दि. 8 मे, 1661 रोजी झाला. म्हणून तो मुंबईचा जन्मदिवस. यंव रे गब्रू! अशा अकलेच्या कांद्यांना आचार्य अत्र्यांसारखा जमालगोटाच पाहिजे. आचार्य अत्रे एका सभेत म्हणाले होते की, “लंडन शहरसुद्धा महाराष्ट्रातच असलं पाहिजे. कारण, त्याच्या नावातली पहिली दोन अक्षरं मराठी आहेत.” श्रोते हसून-हसून मेले होते.
असो. तर रॅफल्सने सिंगापूर जिंकलं आणि त्याचं सैनिकी महत्त्व लक्षात घेऊन त्या ठाण्याचा पक्का बंदोबस्त केला. पुढे हे महत्त्व आणि हा बंदोबस्त सतत वाढतच गेला. सिंगापूर हा ब्रिटिश लष्कराचा आणि नौदलाचा पूर्वेकडचा सर्वात मोठा अड्डा बनला. त्यांनी मुळी त्याला नावच देऊन टाकलं - ‘जिब्राल्टर ऑफ दि ईस्ट.’ पश्चिमेकडे जे आणि जेवढं महत्त्व जिब्राल्टरच्या ठाण्याला, तेच स्थान पूर्वेकडे सिंगापूरला.
 
 
 
1931 साली जपानने चीनच्या मांचूरिया प्रांतावर आक्रमण करून तो प्रांत जिंकला. साम्राज्यवाढीची लालसा जागृत झालेल्या चिमुकल्या जपानने अवाढव्य चीनवर स्वारी करून त्याचा पराभव केला. सावध झालेल्या इंग्रजांनी सिंगापूर बंदराची आणखी मजबूती केली. युरोपमधलीच नव्हे, तर जगातली सर्वात मोठी सुकी गोदी (ड्राय डॉक) त्यांनी सिंगापूर बंदरात 1938 पर्यंत बांधून पूर्ण केली. पण, 1939 साली हिटलरने युरोपात जो झंजावात सुरू केला, त्याने इंग्रजांचे पूर्वेकडचेहिशेब चुकवले.
हिटलरच्या प्रलयकारी लष्करी, हवाई आणि समुद्री आक्रमणाला तोंड देण्यातच ब्रिटनची सगळी शक्ती गुंतून पडली. इकडे जपानने डिसेंबर 1941 मध्ये युद्धात उडी घेतली नि दक्षिण चिनी समुद्रातून अतिशय वेगाने तो सिंगापूरवर तुटून पडला. सिंगापूरमध्ये ब्रिटिश, ऑस्ट्रेलिया,
 
 
 
भारतीय, मलायी आणि चिनी अशी सर्व मिळून सुमारे 60 ते 70 हजार शिबंदी होती. त्यांच्याकडे 15 इंची हॉवित्झर तोफा आणि भरपूर दारूगोळा होता. पण, जपानच्या प्रचंड सामर्थ्यासमोर त्यांचा निभाव लागेना. दि. 8 फेब्रुवारी, ते दि. 15 फेब्रुवारी, 1942 असे सात दिवस त्यांनी खूप चिकाटीने लढा दिला. पण, अखेर दि. 15 फेब्रुवारीला शरणागती पत्करावी लागली. या संघर्षात किमान 30 हजार सैनिक ठार झाले. 1945 साली इंग्रजांनी सिंगापूर पुन्हा जिंकून घेतलं आणि क्रांजी या ठिकाणी 30 हजार सैनिकांचं स्मारक उभारलं.
 
 
 
दि. 15 फेब्रुवारीला इंग्रज सैन्याने शरणागती पत्कारल्यावर त्यांना युद्धकैदी बनवण्यात आलं. भारतीय क्रांतिकारक देशभक्त रासबिहारी बसू सिंगापूरमध्ये आले आणि त्यांच्या प्रयत्नांनी युद्धकैद्यांपैकी 40 हजार भारतीय सैनिकांनी ‘आझाद हिंद सेने’मध्ये प्रवेश केला. जुलै 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस सिंगापूरला आले. ऑक्टोबर 1943 मध्ये त्यांनी सिंगापूरमधूनच ‘आझाद हिंद सरकार’ स्थापन झालं असल्याची घोषणा केली. ‘आझाद हिंद सेना’ आगेकूच करीत इंफाळपर्यंत आली. पण, मार्च ते जुलै 1944 या कालखंडात ‘आझाद हिंद सेने’ला मोठं नुकसान सोसून माघार घ्यावी लागली.
 
 
 
या युद्धात बलिदान झालेल्या हुतात्माचं स्मारक दि. 8 जुलै, 1945 या दिवशी स्वतः नेताजी सुभाषांनी ‘एस्प्लनेड पार्क’ या ठिकाणी उभं केलं. पुढे जपानचा पराभव झाला. सिंगापूर लॉर्ड लुई माऊंटबॅटनच्या अधिपत्याखालील इंग्रजी सैन्याने पुन्हा ताब्यात घेतलं. तेव्हा इंग्रज सैनिकांनी हे ‘आझाद हिंद सेने’चं स्मारक सर्वप्रथम उद्ध्वस्त केलं. 1995 साली स्वतंत्र सिंगापूर सरकारने अगोदर ते नेमकं ठिकाण शोधून काढलं आणि तिथे एक नामफलक उभारला. 2015 मध्ये नरेंद्र मोदींनी त्याला आवर्जून भेट दिली. ‘आझाद हिंद सेने’च्या स्मारकाला भेट
 
 
@@AUTHORINFO_V1@@