नागपूर : "शिवसैनिक म्हणून आम्ही जन्मतःच माजोरडे आहोत. आमचा माज काय आहे हे तुम्ही पाहिलंत आणि तो या पुढेही दाखवू. आम्हाला पोलिसांची गरज नाही.", असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. शनिवारी (दि. २३ एप्रिल) नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"पोलिसांशी आमची कधीच मैत्री झाली नाही, आम्ही कधी त्यांचा वापर केला नाही. आजही जी लढाई करतोय ती पोलिसांच्या सत्तेच्या बाळावर केलेली लढाई नाही. आमच्यात शिवसेनेचा माज आहे. हा माज आमच्या मनगटात बाळासाहेब ठाकरे यांनी भरलाय आणि तो कायम असाच राहील.", असे राऊत यांचे म्हणणे आहे.
हे बाळासाहेबांचे शिवसैनिक नाहीत; मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा दुरुपयोग!
"मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाहीत. त्याचे शिवसैनिक असते, तर त्यांनी आम्हाला नक्कीच हनुमान चालिसा म्हणण्यासाठी समर्थन दिलं असतं. मात्र आज मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करतायत. त्यांचे शिवसैनिक गुंडगिरी करत घरात घुसून मारण्याचा प्रयत्न करतायत. ज्या बाळासाहेबांचे विचार मातोश्रीत आजही आहेत. त्याच मातोश्रीमधून शिवसैनिकांना बोलवून आमच्यावर हल्ला करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून दिले जात आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे."
- रवी राणा, आमदार, भाजप