कोल्हापूर वनविभागाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2022   
Total Views |

kp
मुंबई (प्रतिनिधी): कोल्हापूर विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) कार्यालयाचे उदघाटन शुक्रवार दि. २२ रोजी करण्यात आले. जुने कार्यालय कोल्हापूरच्या  विचारेमाळ, सदर बाजारमध्ये  स्थलांतरीत करण्यात आले आहे.  या प्रसंगी एका वातानुकूलित बस व दोन जंगल सफारी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले आहे. तसेच शाहू स्मारक भवन येथे वन्यजीव फोटोग्राफी प्रदर्शनाचे उद्घाटन मा. पालकमंत्री सतेज पाटील यांचा हस्ते झाले.
 
या नूतन कार्यालयाचे उदघाटन काल दि. २२ रोजी सकाळी ९.०० वाजता झाले. जुने कार्यालय हे आता विचारेमाळ, सदर बाजार, कोल्हापूर येथील नविन जागेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. 'जिल्हा नियोजन समिती' कोल्हापूर कडून प्राप्त झालेल्या निधी अंतर्गत या विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच एक वातानुकूलित बस व दोन जंगल सफारी वाहनांचे (बोलेरो कॅम्पर) लोकार्पण सोहळा पार पडला. आणि शाहू स्मारक भवन येथेल वन्यजीव फोटोग्राफी प्रदर्शनाचे उद्घाटन मा. पालकमंत्री श्री. सतेज पाटील हस्ते झाले.
 
या प्रसंगी आमदार जयश्री जाधव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य सुनिल लिमये, आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नानासाहेब लडकत, सहयाद्री व्याघ्र राखीवचे उपसंचालक उत्तम सावंत, कोल्हापूरचे विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) विशाल माळी तसेच विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, कोल्हापूर . एम. बी. चंदनशिवे व वनविभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी/कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@