खोपोलीत प्राणी मित्रांनी आई पासून ताटातूट झालेल्या वासरांना दिला आसरा.

    20-Apr-2022
Total Views | 81

kp
खोपोली(प्रतिनिधी): खोपोलीतील प्राणी मित्र रोहित कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आईपासून ताटातूट झालेल्या वासरांना आसरा दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खोपोली शहरातील कृष्णानगर परिसरात काल सकाळच्या सुमारास प्राणी मित्र रोहित कुलकर्णी यांना बिथरलेल्या अवस्थेत दोन वासरं फिरताना आढळली.त्यांच्यासमवेत त्यांची आई मात्र दिसली नाही. त्या वासरांना चारा दिल्यानंतर रोहित कुलकर्णी आणि रमा जानकी कुलकर्णी या उभयतांनी त्या वासरांच्या आईला शोधण्यासाठी सायंकाळपर्यंत शोध मोहीम राबवली. तोवर त्या वासरांनीही हंबरडा फोडत आपल्या आईला शोधण्यासाठी भटकंती केली होती. वासरांची घालमेल आणि त्यांची अगतिकता पाहून रोहित कुलकर्णी यांनी गोमित्र हनीफ कर्जीकर यांना संपर्क केला. त्या दोघांनी मिळून अनेक गोशाळांमध्ये त्या वासरांची सोय होते का? याची चौकशी केली असता मिळगाव - खोपोली येथील एस. एस. वाय. संस्थेच्या दर्शन पाटणकर यांनी त्या वासरांचे संगोपन करण्याची तयारी दर्शवली.
रमाजानकी कुलकर्णी, हनीफ कर्जीकर, अंबादास शिंदे, सागर म्हामुणकर, शाहिद शेख या सर्वांनी मिळून त्या वासरांची देखभाल करून त्यांना सायंकाळी राजेश शर्मा यांच्या टेम्पो मधून एस. एस. वाय. संस्थेच्या गोशाळेत दाखल केले.
वासरांना तात्पुरता निवारा जरी मिळाला असला तरी त्यांच्याशी तातातूट झालेल्या गाईचा शोध घेतला जाणार असल्याचे रोहित कुलकर्णी यांनी सांगीतले आहे. या सर्व घटनाक्रमाची माहिती खोपोली पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. आर.सी. कदम यांना दिली असून या प्रसंगी भूतदया दाखवून तत्परतेने मदतीला आलेल्या सर्वांचे कुलकर्णी यांनी आभार मानले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121