बीज अंकुरे अंकुरे - भाग-५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

ayurved
मागील लेखात ‘पीसीओएस’ (Polycystic Ovarian Syndrome ) बद्दल आपण वाचले. ‘सीस्ट’ म्हणजे बुडबुडे होय. काही वेळेस ते पोकळ असतात, तर काहीवेळेस भरलेले असतात. फायब्रॉईड्स व ‘सीस्ट’मधला हा महत्त्वाचा फरक आहे की, फायब्रॉईड म्हणजे ग्रंथी गाठ (कडक गोळा) व ‘सीस्ट’ म्हणजे बुडबुडा. प्रत्येक व्याधीची चिकित्सा भिन्न असते. जरी ती एक विशिष्ट अवयव, शरीर भागात होत असली तरी... त्याविषयी आजच्या भागात जाणून घेऊया...
 
 
आयुर्वेद शास्त्रात केवळ औषधी चिकित्सा म्हणजे संपूर्ण चिकित्सा मानली गेली नाही. ‘औषधी चिकित्सा’ म्हणजेच त्याला ‘द्रव्य चिकित्सा’ असेही म्हटले जाते. अद्रव्य चिकित्सेमध्ये औषधोपचाराव्यतिरिक्त केलेली चिकित्सा गणली जाते. यामध्ये पथ्यापथ्याचा विचार होतो. व्यायामाचा अंतर्भाव होतो. आहाराबरोबरच विहार (डेली रुटिन) व विचार यांच्यावरही काही बदल अपेक्षित आहेत. आधुनिक काळात यालाच ‘लाईफस्टाईल चेंज’ असे संबोधिले जाते.
चिकित्सेचे मुख्यत्वेकरुन तीन विभाग आयुर्वेदशास्त्रानुसार करता येतात - समतोल राखणे, जेणेकरुन व्याधी उद्भवणार नाहीत. व्याधिनुरुप चिकित्सा (द्रव्य चिकित्सा व अद्रव्य चिकित्सा) आणि अपूनर्भव चिकित्सा (पुन्हा व्याधी उद्भवू नये) पुनरावृत्ती टाळण्यासाठी म्हणजे Prevention Therapeutic and non- recurrence of Disease, असे संपूर्णपणे व्याधीचे शरीरातून समूळ निर्मूलन करणे, हे आयुर्वेदशास्त्राने शक्य आहे.
 
द्रव्यचिकित्सेमध्येदेखील लेप, उद्वर्तन, उद्घर्षण, बंध इ. बाह्योपचार सांगितले आहेत. औषधोपचार, शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा (म्हणजेच पंचकर्म) वर्णिले आहे. तसेच क्षार कर्म, अग्नी कर्म व शास्त्र कर्म इत्यादीचाही उल्लेख चिकित्सेमध्ये केला आहे. म्हणजेच आयुर्वेदानुसार ही चिकित्सा करताना केवळ अभ्यंतर चिकित्साच सगळ्या व्याधींवर सारखीच प्रभावीपणे काम करते असे नाही.विविध सीस्ट, फायब्रॉईड इ. चिकित्सेत याचा प्रत्यय येतो. ‘पीसीओएस’सारखाच बीजाशयामध्ये होणारा अजून एक ‘सीस्ट’चा प्रकार म्हणजे ‘चॉकलेट सीस्ट’ होय. यालाच ’Cystic Ovarian Mass’ असेही म्हणतात. यामध्ये रजप्रवृत्तीच्या वेळेस होणारा रक्तस्राव व अन्य मृत पेशी गोळा होतात. या बीजाशयात खोलवर रूततात. या मृतपेशी व रक्तामुळे याचा रंग तपकिरी काळपट असा असतो. वितळलेल्या चॉकलेटसदृश त्याचा रंग असल्याने याला ‘चॉकलेट सीस्ट’ असे म्हणतात. ‘ओव्हरिज’मध्ये असल्याने ‘Ovarian Endometrioma’ असेही म्हटले आहे.
 
‘चॉकलेट सीस्ट’ एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात. तसेच एका किंवा दोन्ही बीजाशयांमध्ये (‘ओव्हरिज’मध्ये) होऊ शकतात. मृत पेशींमुळे बीजाशयांमध्ये सूज येऊ शकते व त्याच्या प्राकृत कार्यात बाधा निर्माण होते. ‘चॉकलेट सीस्ट’चा आकार २ -२० सेंमी इतका असू शकतो. या ‘सीस्ट’च्या आकार व संख्येनुसार व रूग्णप्रकृतीनुसार काही लक्षणे उद्भवतात. काहींमध्ये कुठलीच तक्रार नसते. काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळेस अधिक त्रास होतो. ओटीपोट, कंबर अति दुखणे, मुरडा येणे, रजःस्रावाच्या दिवसांव्यतिरिक्त ही ओटीपोटात दुखत राहणे, वारंवार अनियमित रजःप्रवृत्ती, नियमित चक्र बिघडणे, नियमित मासिक स्रावाबद्दल पूर्वीच्या लेखांमध्ये सविस्तर लिहिले आहेच. काही स्त्रियांमध्ये संबंधांच्या वेळेस अतितीव्र वेदना होते व काहीमध्ये वंध्यत्व येते. जर हा ‘सीस्ट’ अचानक फुटला, तर ज्या बाजूच्या बीजाशयातील ‘सीस्ट’ असेल, तेथे तीव्र वेदना जाणवू लागते व ‘इमर्जन्सी’मध्ये शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. पण, जर ‘चॉकलेट सीस्ट’ आकाराने व संख्येने कमी असतील, तर थोडा धीर धरावा. शरीर हे असे उत्तम यंत्र आहे की, छोटे-मोठे बिघाड ते स्वतःच दुरुस्त करते. त्याला औषधोपचार लागत नाही. अशी मानवी शरीर यंत्रणा जर नसती, तर प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत काहीना काही औषधोपचारांची जोड लागलीच असती.
 
मध्यम आकाराचे व संख्येचे ‘चॉकलेट सीस्ट’ असल्यास औषधोपचार नक्की करावेत. (द्रव्य चिकित्सा व त्याबरोबरच अद्रव्य चिकित्सा दोन्ही) यात उत्तर बस्ती, वमन, मात्रा बस्ती, आभ्यंतर चिकित्सेचा विशेष फायदा होतो. रजःप्रवृत्तीचे नियमन केल्यास ‘चॉकलेट सीस्ट’ कमी होऊ लागतात. तसेच ‘सीस्ट’ कमी होऊ लागल्यास रजःप्रवृत्ती आपसूक नियमित होते. तेव्हा, सुरुवातीस तीव्र वेदना व अनियमितता असताना चिकित्सा करावी व नियमित झाल्यास अपुनर्भव चिकित्सा घ्यावी.काही वेळेस चार सेंमीच्या वर ‘चॉकलेट सीस्ट’ असल्यास व संख्येनेही अधिक असल्यास शस्त्र कर्माची गरज पडू शकते. काही वेळेस अनियमित रजःप्रवृत्तीच्या वेळेस अत्याधिक रक्तस्राव होऊन थकवा व ‘अ‍ॅनिमिया’ उद्भवतो, ते टाळावे. ‘चॉकलेट सीस्ट’ आहे की नाही, याचे निदान तज्ज्ञ वैद्य परीक्षणाने व अन्य काही चाचण्यांनी करु शकतो. (Pelvic Examination, Sonography-Usg) बरेचदा ‘चॉकलेट सीस्ट’ हे केवळ लक्षणस्वरुप उद्भवते. पण, त्याचे मुख्य कारण म्हणजे ’Endometriosis’ हा रोग आहे. ’Endometriosis’ मध्ये गर्भाशयाच्या अंतस्त्वचेची अतिरिक्त वाढ होऊन ती गर्भाशयाच्या बाहेरील अवयवांना आच्छादित करते. २०-४० टक्के रुग्ण ज्यांच्यामध्ये ’Entometriosis’ असे निदान झाले.
 
 
 
 
त्यांच्यामध्ये ‘चॉकलेट सीस्ट’ही दिसून येते. ’Pelvic Examination’ व ’USG’ बरोबरच ‘एमआरआय’ व ‘लेप्रोस्कोपी’ इ. चाचण्या व रक्त तपासणी (Harmonal Assay) करावे लागते. ’Endometriosis’ मध्ये ओटीपोटात, योनी व गुद भागाशी तीव्र वेदना जाणवतात. मलप्रवृत्तीच्या वेळेस व संभोगच्या वेळेस तीव्र वेदना होतात. ‘चॉकलेट सीस्ट’मध्ये सांगितल्याप्रमाणे यातही रजःप्रवृत्तीचे चक्र बिघडते. मळमळणे, शौचास साफ न होणे, शरीर जड होणे इ. सार्वदैहिक लक्षणे पण उद्भवतात.
हे व्याधी जरी प्रजनन संस्थेतील विविध अवयवांचे असले, तरी त्यांची कारणे ही मनोकायिक (झीूलहेीेारींळल) श्रेणीत मोडतात. अत्यधिक प्रमाणात तेलकट, चमचमीत, शीळं (तसेच शोर्मा, सोया सॉस, चिली सॉस, शेजवान सॉस इ.) खाल्ल्याने प्रजनन संस्थेचे व रजःप्रवृत्तीशी निगडित विविध तक्रारी बळावतात, हे रुग्णांशी संवाद साधल्यावर लक्षात येते.
पुढील लेखांमधून Tubal BLock, Endimetrial Polyp, Uterine Fibroids इ. बद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (क्रमश:)
 
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@