अखेर जेएनपीटी आणि एमएमआरडीए कडून होणार कांदळवनांचे हस्तांतरण.

    19-Apr-2022
Total Views | 130

mang
 
 
मुंबई(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी त्यांच्या ताब्यातील १०१४ हेक्टर कांदळवन आच्छादित जमीन राज्याच्या वन विभागाकडे सुपूर्द करणार असल्याचे मान्य केले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात ट्वीट द्वारे माहिती दिली. सोमवारी, दि. १८ रोजी झालेल्या आढावा बैठकीत जेएनपीटीने आपली ८१५ हेक्टर कांदळवन आच्छादित जमीन वन विभागाला देण्याचे मान्य केले आहे. तर, एमएमआरडीए १९९ हेक्टर जमीन सुपूर्द करणार आहे.

या पूर्वी ११ जानेवारी २०२२ रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 'जेएनपीटी', 'सिडको', वन विभाग आणि कोकण विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली होती. या बैठकीत ठाकरे यांनी 'जेएनपीटी'ला त्यांच्या ताब्यातील कांदळवन आच्छादित जमिनींचे घोषणा करण्याबाबत तीन महिन्यांचे अल्टिमेटम दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर, २०१८ रोजी कांदळवन आच्छादित सरकारी जमिनींवरील वाढते अतिक्रमण लक्षात घेता एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. या निर्णयानुसार कांदळवन आच्छादित सर्व सरकारी जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते. यापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या कांदळवन संरक्षण आणि संवर्धन समितीने 'जेएनपीटी' ला कांदळवन नष्ट केल्याबद्दल दंड ठोठावला होता.

त्याच बरोबर 'सिडको'च्या ताब्यात असलेले अंदाजे १,८०० हेक्टर कांदळवन आच्छादित क्षेत्र हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत आहे. हे क्षेत्र आम्ही पूर्वी विकत घेतले असून त्यावर काही प्रकल्प प्रस्तावित असल्याचे सांगून या जमिनींच्या हस्तांतराबाबत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न 'सिडको'कडून केला गेला होता. तसेच विरार-वसई महानगर पालिकेच्या मालिकेच्या १,४०० हेक्टर कांदळवन वनविभागाच्या ताब्यात येणे बाकी आह.
अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत

मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत 'कलम ४०' चा गैरवापर; वक्फ बोर्डाचे धक्कादायक वास्तव उघडकीस!

लोकसभेत १२ तासांबून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक पास झाले. दरम्यान विधेयकाच्या बाजूने एकूण २८८ मते पडली, तर विरोधात २३२ मते पडली आहेत. वास्तविक हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या पारदर्शकतेबाबत आहे, मात्र विरोधक याला धार्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर वक्फ विधेयकात सुधारणा करणे आवश्यक होते. कारण त्यातील 'कलम ४०' त्याला कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याची सूट देत होते. अशातून वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीच नाही तर मंदिरे आणि चर्चवरही आपला दावा मांडला होता. Waqf Board misuse of ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121