मुंबई: आम्ही कुठल्याही धर्माच्या, धार्मिक परंपरांच्या विरोधात नाही पण जर या सर्व धार्मिक परंपरा जर इतरांना त्रासदायक ठरत असतील तर मात्र त्यांना विरोध करणे आम्हाला भागच आहे अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दिली आहे. देशातील ९ हजार मंदिरांना लाऊडस्पीकर वाटण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. "न्यायालयाने घालून दिलेले ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम पाळूनच या स्पीकर्सवरून भजने, हनुमान चालीसा, रामकथा या सर्व हिंदू धर्मियांना प्रिय गोष्टी लावल्या जातील" असेही त्यांनी नमूद केले.
याच वेळी त्यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. "शिवसेनेने सत्तेसाठी स्वतःच्या विचारधारेला सोडून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीही या भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला होता पण शिवसेनेने आता सत्ता मिळवण्यासाठी ज्या लोकांनी देशात हिंदू दहशतवादी ही संकल्पना निर्माण केली त्या लोकशी सोयरीक केली आहे" अशा शब्दांत कंबोज यांनी टीका केली आहे.