राष्ट्रविरोधी घटकांकडून रोहिंग्यांमार्फत मुंबईमध्ये हिंसा भडकविण्याचे षड्यंत्र!

मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा यांचे खळबळजनक आरोप

    13-Apr-2022   
Total Views | 131
 
 
lodha
 
 
मुंबई : “राष्ट्रविरोधी घटकांकडून रोहिंग्यांमार्फत मुंबईमध्ये हिंसा भडकविण्याचे षड्यंत्र सुरू आहे,” असे खळबळजनक आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान केले.
 
 
मालवणी, मानखुर्दमधील घटना सुनियोजित होत्या, असे वाटते का?
 
 
मालवणी-मानखुर्द या दोन्ही ठिकाणी झालेल्या घटनांची बीजे अनेक वर्षांपूर्वी रोवण्यात आलेली आहेत. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना या ठिकाणी वसवून मुंबईतील विविध उद्योग जे मुंबईकरांच्या हक्काचे उद्योग होते, त्यात रोहिंगे आणि बांगलादेशींना घुसवले गेले. या सर्व उद्योगांमध्ये आता काही राष्ट्रविरोधी घटकांच्या पाठिंब्यामुळे उभारलेल्या रोहिंगे आणि बांगलादेशींनी आपली मुळे मजबूत केलेली आहेत. त्यामुळे आता त्यांना कसल्याही गोष्टीचा धाक किंवा वचक राहिलेला नाही. कुठल्याही कायदा किंवा नियमाचे पालन न करता थेट अशा प्रकारची हिंसा करण्यापर्यंत या घटकांची हिंमत आता वाढली आहे.
 
 
मालाड-मालवणीनंतर आता मानखुर्द हे अशाप्रकारच्या हिंसात्मक घटनांचे केंद्र बनू लागले आहे का?
 
 
आम्ही काही दिवसांपूर्वी विविध नागरिकांशी या विषयावर संवाद साधण्याचे काम केले होते. तेव्हा त्या संवादातून बाहेर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती. मानखुर्द हिंसात्मक घटनांचे केंद्र बनलेलेच आहे, त्याचे फक्त प्रात्यक्षिक आता सर्वांना पाहायला मिळाले. केवळ मानखुर्दच नाही तर मुंबईत सुमारे 32 पेक्षा अधिक ठिकाणी अशा प्रकारची हिंसात्मक केंद्रे बनलेली आहेत. मालवणी-मानखुर्द ही उदाहरणे समोर आली आहेत. पण येत्या काळात असेच प्रकार आपल्याला चेंबूर, कुलाबा, मोहम्मद अली रोड, कुलाबा अशा ठिकाणी जर बघायला मिळाले तर नवल वाटायला नको. कारण, अशा अनेक ठिकाणी बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वसवून त्यांच्या माध्यमातून मुंबईत हिंसा भडकविण्याचे षड्यंत्र हे काही राष्ट्रविरोधी घटकांकडून सुरू आहे.
 
 
मालवणीबाबत आपण वारंवार विधानसभेत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र, सरकारने त्यावर गांभीर्याने लक्ष दिले नाही, असे तुम्हाला वाटते का?
 
 
सध्या राज्यात अस्तित्वात असलेले सरकार बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मतांशिवाय पुन्हा निवडून येणे अशक्य आहे. या सरकारमधील पक्षांचे जे मूळ मतदार होते, ते आता त्यांच्यासोबत राहिले नसल्याने त्यांना आता अशा प्रकारच्या घटकांचा आधार घ्यावा लागत आहे. हे सरकार अशा बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या विरोधात काही कारवाई करेल, अशी अपेक्षा धरणे अयोग्य आहे. त्यामुळे जोवर हे सरकार राज्यात आहे तोवर हिंदूंनी कितीही आक्रोश केला, आंदोलने केली मोर्चे काढले तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. त्यासाठी सरकार बदलणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या मार्गाने जर हे सरकार बदलले, तरच या राज्यात आणि मुंबईत धर्म आणि संस्कृती सुरक्षित राहील, अशी आजची स्थिती आहे.
 
 
या घटनांमध्ये पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेकडे आपण कसे पाहता?
 
 
केवळ मालाड-मालवणीत नाही, तर मागील सर्व प्रकारांमध्ये पोलिसांनी घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची आहे. नव्हे तर आज मुंबई पोलीस हे राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या आपल्या वरिष्ठांच्या भूमिकेनुसार वागत आहेत, हा माझा थेट आरोप आहे. धार्मिकस्थळांवर आरती करणार्‍या हिंदूंवर गुन्हे दाखल करणार्‍या सरकारतर्फे हिंसाचार सहभागी असलेल्या घटकांना दिली जाणारी ‘व्हीआयपी’ वागणूक जनता बघते आहे. मुंबईकर फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आहे, एकदा वेळ आली की लगेच या सर्व गोष्टी व्याजासकट परत केल्या जातील, हे निश्चित आहे. दररोज पाच वेळा दिल्या जाणार्‍या अजानला परवानगी दिली जाते. परंतु, वर्षभरात एकदाच साजरी केली जाणारी रामनवमी मात्र निर्बंधात ठेवली जाते. या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्यांमध्ये मोठे परिवर्तन आले असून त्यांना संभाव्य परिणामांचीही कल्पना आली आहे. जे प्रकार आसाम, पश्चिम बंगाल आणि काश्मिरात झाले त्याची पुनरावृत्ती मुंबईत होऊ शकते, याची मुंबईकरांना पुरेपूर कल्पना आली असून आताचा हिंदू बॉम्बस्फोट आणि रक्तपात सहन नक्कीच करणार नाही. आपली, आपल्या कुटुंबाची आणि आपल्या धर्माची सुरक्षा करण्यासाठी मुंबईकर सक्षम आहे.
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
पाक सैन्याचा खोटारडेपणा पुन्हा उघड! म्हणे, तो दहशतवादी नव्हेच तो तर साधा मौलवी...

पाक सैन्याचा खोटारडेपणा पुन्हा उघड! म्हणे, "तो दहशतवादी नव्हेच तो तर साधा मौलवी..."

(Pakistan LeT Terrorist Hafiz Abdul Rauf) पाकिस्तानी लष्कराचे जनसंपर्क प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत व्हायरल झालेल्या एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारातील फोटोविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ज्यातून पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस आला आहे. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात असलेला व्यक्ती हा लष्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी असल्याचा भारताने दावा केला होता. यावर पाकिस्तानकडून फोटोतील व्यक्ती हा एक साधा कुटुंबवत्सल आणि धर्मप्रचारक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांच्या मृतदेहांवर फातिहा पठण करणारा दुसरा तिसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121