नवी दिल्ली: कुतुबमिनार मिनार परिसरातील २७ हिंदू मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. ही सर्व मंदिरे कुतुब मिनारच्या आधी इथे होती आणि त्यांना उध्वस्त करून कुतुब मिनार उभारण्यात आला असल्याचा दावा विहिंप कडून करण्यात आला आहे. ही सर्व मंदिरे पुन्हा बांधण्यात येऊन तिथे पूजाअर्चेला परवानगी देण्यात यावी अशी मागणी विहिंपचे अध्यक्ष विनोद बन्सल यांनी केली आहे.
विनोद बन्सल यांनी या परिसराला भेट दिल्यानंतर ही मागणी केली आहे. "येथे पूर्वी २७ हिंदू - जैन मंदिरे होती ती उद्धवस्त करून येथे कुतुबमिनार उभारण्यात आला त्यामुळे आता त्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात यावी" अशी प्रतिक्रिया बन्सल यांनी दिली आहे.