कोलंबो: श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात आता श्रीलंकेतील तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांनी राजपक्षे यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. "गो होम गोता" म्हणजे तुमची जाण्याची वेळ आली आहे असे फलक घेऊन हजरो तरुण श्रीलंकेच्या रस्त्यांवर दिसत आहेत. श्रीलंकेतील आर्थिक संकट गहिरे होत असून जीवनावश्यक वस्तूंचीसुद्धा तीव्र टंचाई निर्माण जाहली आहे.
श्रीलंकेतील व्यापारी वर्गही राजपक्षे यांच्या विरोधात गेला आहे. श्रीलंका असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्सपोर्टर्स ऑफ रबर प्रॉडक्ट्सचे प्रमुख रोहन मासाकोर्ला यांनी प्रतिक्रिया देताना नवीन सरकार हवे अशी मागणी केली आहे. श्रीलंकेतल्या अस्थिरतेने स्थलांतर वाढले आहे. तामिळनाडू किनाऱ्यावर श्रीलंकेतुन येणाऱ्या नागरिकांचा ओघ वाढतो आहे. भारत सरकारने आतापर्यंत श्रीलंकेला सातत्याने मदत पुरवली आहे.