राजकीय वारसा लाभलेल्या कल्याण पूव्रेतील भाजपा अनुसूचित मोर्चाच्या सरचिटणीस मिना दिपक टोकेकर या देखील सामाजिक कार्य करता करता आता राजकरणात सक्रीय सहभागी झाल्या आहेत. महिला राजकारणांतील सक्रीय सहभाग हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. राजकारणात येऊनच चांगलं समाजकारण करता येते. मल्टिटास्किंग हा गुण महिलांकडे असल्याने त्या राजकारण आणि घर यांची सांगड योग्यरीतीने घालू शकतात. तिच्याकडे जिद्द असेल तर देशाची परिस्थिती बदलण्याची ताकद महिलांकडे आहे. म्हणूनच स्त्रियांनी मोठय़ा प्रमाणात राजकारणात आले पाहिजे असे टोकेकर सांगतात.
बीड जिल्हयातील परळी वैजनाथ हे बारा ज्योतिलिंग मंदिरापैकी एक जागृत देवस्थान आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचे जन्मभूमी व कर्मभूमी असलेले धार्मिकदृष्टया महत्त्वाचे स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथेच मिना यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण छत्रपती विद्यालय येथे झाले. वैजनाथ महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. र्पयतचे शिक्षण घेतले. त्यानंतरचे शिक्षणासाठी मात्र त्यांनी अंबेजोगाईची वाट धरली. परळी वैजनाथपासून 25 कि .मी.वर असलेल्या अंबेजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयातून एम.ए. चे शिक्षण घेतले. मिना यांना गायनाची देखील आवड आहे. त्याबाबतचे त्यांनी कोणतेही शिक्षण घेतले नाही. पण त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांकडून ‘वाह क्या बात है’ ची दाद मिळत असते.
राजकारण हे त्यांच्या घरातच होते. त्यामुळे न कळतपणो राजकारणाचे संस्कार मिना यांच्यावर होत होते. मिना यांचा मावस भाऊ सचिन कागदे हे परळी येथे भाजपाच्या गटनेते पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांचा सख्खा भाऊ महेंद्र जगताप यांनी देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे. मिना यांना सामाजिक कार्याची आवड होतीच. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलांचे शिकवणी घेण्याचे काम त्या करीत होत्या. विद्याथ्र्याना शिकविताना त्यांना समुपदेशन चांगले करू शकते असे त्यांना वाटू लागले. या कामात मिना यांना चांगली गती मिळाली.पुढे तीन वर्ष त्या विद्याथ्र्याचे समुपदेशन करीत होत्या.
मिना लग्नानंतर 2000 साली कल्याणमध्ये आल्या. माहेरहून त्यांना राजकीय वारसा मिळालाच होता. पण सासर ही त्यांना राजकारणात आपले कर्तृत्व सिध्द केलेले असेच मिळाले. त्यांचे सासरे रामदास टोकेकर हे देखील भाजपाशी संलग्न होते. त्यांनी आपली जागासुध्दा कल्याण पूव्रेत पक्षाला कार्यालयासाठी दिली होती. त्यांच्या पतीमुळे त्यांना राजकारणाची आणखी गोडी लागली. मिना यांचे पती भाजपाच्या आरटीजनसेलचे प्रदेश सदस्य होते. 2010 पासून त्या समाजकारणात सक्रीय झाल्या. पाथरवट समाज उन्नती मंडळात त्या पतीसोबत सहभागी होत होत्या. राजकारणात येऊन समाजकारण चांगलं करता येऊ शकते असा विचार त्यांनी केला. सासरच्या पावलांवर पाऊल टाकीत 2014 ला त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्याक ाळात नरेंद्र पवार हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते.
समाजकारण व राजकारणात काम करीत असताना कुटुंबियांचा पांठिबा मिळाला. पती दिपक यांच्यामुळेच राजकारणात उतरली आहे. त्यांची साथ लाभल्यामुळे हे काम करीत आहे. भाजपाचे काम कश्या पध्दतीने केले पाहिजे. त्या प्रत्येकाशी चर्चा करणो, जनसंपर्क कसा वाढला पाहिजे. त्यांच्या सुखदुखात सहभागी झाले पाहिजे या सगळ्य़ा गोष्टी पतीकडून शिकली असल्याचे मिना सांगतात. घर सांभाळून इतर सर्व कामे करीत आहे. आतार्पयत कधी सामाजिक कार्य करताना कोणत्याच अडचणी आल्या नाहीत. केवळ वेळेचे नियोजन करण्याची गरज आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास घर आणि राजकारण या दोन्ही जबाबदारी व्यवस्थित पार पडता येते. भाजपाकडे एखाद्या शहरासाठी व्हिजन असते. त्यांचा पाठपुरावा करणे. महापालिकेचा विकास करणो, महापालिका अवाढव्य वाढल्या आहेत. पण सुविधाच्या नावाने सगळी बोंबच आहे. फेरीवाल्या असो किंवा इतर अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो. पक्षाचा संघटनात्मक ढाचा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असल्याचे मिना सांगतात.
मिना यांनी अनेक सामाजिक कार्यात हिरीराने सहभाग घेतला आहे. आयुष्यमान भारत योजनेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात शिबीराचे आयोजन केले होते. त्या योजनेत महिलांनी सहभागी व्हावे यासाठी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन त्याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे घरकाम करणा:या तीनशेहून अधिक महिलांना त्यांचा फायदा झाला आहे. कोरोना काळात काम केलेल्या कोविड योध्दा महिलांचा सन्मान केला आहे. अनुसूचित जाती जमातीना भाजपाशी जोडण्याचे काम त्यांनी केले आहे. या समाजाला एकत्रित आणण्याचे काम त्या करीत आहेत. कल्याणला देखील पूराच्या पाण्याचा फटका बसला होता. पूरग्रस्तांना मदतीचा हात त्यांनी दिला. त्यांच्या घराची पाहणी के ली. तसेच त्यांना आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले. या पूरग्रस्तांना जेवण देण्याचे काम त्यांनी केले आहे. महिलांसाठी विविध कार्यक्रम करणे, स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या कायम पुढे असतात. आमदार गणपत गायकवाड यांच्या व्हिजनप्रमाणे कल्याण पूर्वचा विकास साधला जात आहे. त्यात खारीचा वाटा उचलण्याचे काम करण्याचा मानस त्यांचा आहे.
मिना यांना संविधान दिनानिमित्त काही ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे. शालेय जीवनात गायनात पुरस्कार मिळाले आहे. महाविद्यालयीन जीवनात ज्येष्ठ कवी फ. मो. शिंदे यांच्या हस्ते गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. केवळ गायनच नाही तर खेळांत ही त्यांनी विशेष प्राविण्य मिळविलेले आहे. कबड्डी,लंगडी, खो-खो यात त्या सहभागी होत होत्या. कोणत्याही गोष्टीत कधी हार मानायची नाही. प्रत्येक गोष्टीचा आनंद जीवनात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्या सांगतात.
या प्रवासात त्यांना आमदार गणपत गायकवाड, आमदार रविंद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पूर्व संघटक प्रमुख दिनेश अग्रवाल, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,कल्याण जिल्हा उपाध्यक्ष नाना सूर्यवंशी,माजी नगरसेवक मनोज राय, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, राजेश पिल्ले, अमोल देशमुख, सुभाष म्हस्के, वंदना मोरे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.
"महिलांनी स्वत: आत्मनिर्भार बनण्याची गरज आहे. स्वत:वर विश्वास असला पाहिजे. तिच्याकडे जिद्द असेल तर ती स्व:बळावर काही ही करू शकते. राजकीय क्षेत्रात महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. इतर क्षेत्रात महिला ज्याप्रमाणे पुढे जात आहे. त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रात ही करियरसाठी पुढे येण्याची गरज आहे. राजकीय क्षेत्रात महिला मोठय़ा प्रमाणात येत नाही. देशाची परिस्थिती बदलायाची असेल तर महिलांनी राजकीय क्षेत्रात पुढे आले पाहिजे. लोक फक्त राजकारण खराब आहे असा दोष देत असतात. पण तसं नाही. राजकारण सुध्दा चांगले क्षेत्र आहे. अनेकदा महिला निवडून येते. पण कारभार सगळा नवरा पाहत असतो. तसे न करता महिलांनी सर्व माहिती ठेवून राजकारण क्षेत्रात ही पुढे आले पाहिजे."