नवी दिल्ली: रशिया -युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या दरम्यान रशियन विमानांच्या रॉकेट हल्ल्यांत युक्रेनचे विनितसिया विमानतळ उद्धवस्त झाले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याबद्दल ट्विटरवर माहिती दिली आहे. रशियाकडून युक्रेनी नागरिकांच्यावर सुद्धा गोळीबार केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रशियन फौजांचे पुढे लक्ष्य युक्रेनचे बंदर ओडेसा हे आहे असेही झेलेन्स्की यांनी सांगितले आहे.
रशिया- युक्रेन दरम्यान चालू असलेले युद्ध ११ दिवस उलटून गेले तरी सुरूच असून उलट ते जास्त संहारक होत चालले आहे. युक्रेनने आतापर्यंत रशियाचे १० हजारांहून जास्त सैनिक मारले असल्याचा दावा युक्रेनकडून केला जात आहे. रशियाकडूनही युक्रेनचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला जात आहे. लवकरच रशिया आपले उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केला आहे.