मुंबई : पालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्या गोरगरीब कुंटुंबातील विद्यार्थ्यांना आता पौष्टिक नाश्त्याचे वाटपही केले जाणार आहे. पालिकेकडून विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजन दिले जाते. मात्र आता 'अक्षय चैतन्य' संस्थेच्या माध्यमातून भूकमुक्त मुंबई मोहिमेंतर्गत राबवण्यात येणारया 'बाल सुरक्षा आहार' या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासवर आणखी लक्ष केंद्रित होण्यास मदत होणार असल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
"या कम्युनिटी किचनमध्ये दररोज तब्बल २५ हजार गरजू लोकांसाठी मोफत जेवण बनवले जाणार आहे. भविष्यात सुरू होणाऱया शाळांमध्येही 'अक्षय चैतन्य'च्या सहकार्याने पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, असेदेखील पुढे ते म्हणाले. 'अक्षय चैतन्य' संस्थेच्या माध्यमातून भायखळा येथे सुरू करण्यात आलेल्या 'सेंट्रलाइज्ड कम्युनिटी किचन' या उपक्रमाचे लोकार्पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर याद्केहील उपस्तीत होत्या.