नवी दिल्ली : युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना आयपीएस, रेल्वे संरक्षण दल आणि अंदमान-निकोबार, दिल्ली, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीप पोलीस सेवेत नोकरीसाठी अर्ज सादर करण्याची परवानगी शुक्रवारी (दि. २५ मार्च) सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली. हा निर्णय अंतरिम असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित आदेश यावेळी न्यायमूर्ती ए.एस.खानविलकर आणि न्यायमूर्ती अभय ओका यांच्या खंडपीठामार्फत देण्यात आला आहे. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना दि. १ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत आयपीएस आणि इतर सेवांमध्ये नोकरीसाठी अर्ज सादर करता येणार आहेत. मात्र अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे.