बेंगळुरू: कर्नाटक हिंदू देवळे आणि धर्मादाय संस्था कायदा २००२च्या अनुसार हिंदू देवळांच्या परिसरात अहिंदू लोक धंदा करू शकत नाहीत, कर्नाटकचे कायदा मंत्री जे सी मुधुस्वामी यांनी कर्नाटक विधानसभेत अशी माहिती दिली. काँग्रेस कार्यकाळातच हा कायदा झाला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या कायद्यातील नियम १२ मध्ये या बद्दल उल्लेख आहे.
कर्नाटकात गावांतील जत्रांमध्ये मुस्लिम दुकानदारांना दुकाने लावण्यास मनाई केली जात असल्याच्या घटना समोर येत होत्या त्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसच्या आमदाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुधूस्वामी यांनी हा उल्लेख केला. “आपले सरकार या कुठल्याही प्रकरांना उत्तेजन देत नसून २००२ साली कॉँग्रेस सरकारने केलेल्या कर्नाटक हिंदू देवळे आणि धर्मादाय संस्था कायद्यानुसार हिंदू देवळांच्या आजूबाजूची कुठलीही जागा किंवा इमारत ही अहिंदू लोकांना दिली जाणार नाही.” असे या कायद्यात म्हटले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या सर्व प्रकरणाचा आढावा घेतला जाईल तसेच यावर के उपाय करता येतील याचीही चाचपणी सरकार करेल. अशा प्रकरणांवर लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी गृहमंत्र्यांना दिले आहेत.