शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास एम के स्टॅलिन आणि एमआयएमआयएम यांचा विरोध !

    22-Mar-2022
Total Views | 212

shivaji maharj
बोधन : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अत्यंत घनिष्ट असे नेते म्हणून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन प्रसिद्ध आहेत. मागील काहीच दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र दौरा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच शरद पवार आणि इतर मुख्य नेत्यांची भेट घेतली होती. या महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी त्यांचे तोंडभर कौतुक केले होते. त्याच तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी तामिळनाडूतील बोधन शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या मागणीवरून होणाऱ्या हिंसाचारावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


बोधन शहरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध का ?

तामिळनाडूच्या बोधन शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी तेथील महानगरपालिकेत मागणी केली गेली होती आणि त्यांनी ती मान्यही केली होती. मात्र जागा , स्थळ ठरले नव्हते. तेथील काही शिवप्रेमींनी बोधन शहरातील एका ठिकाणी शिवजयंतीचा मुहूर्त साधत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. मात्र यास तेथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने यास विरोध केला.त्यांच्याद्वारे सांगण्यात आले की तुम्ही पहिली परवानगी घेऊन या. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री शहरातील आंबेडकर जंक्शनवर छत्रपती शिवाजींचा पुतळा बसवल्याच्या निषेधार्थ आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तेलंगणातील बोधन शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.


बोधन नगरपालिकेने नुकतेच पुतळा बसविण्याचे मान्य केले होते, परंतु त्यांनी ना जागा ओळखली होती ना आंबेडकर जंक्शनवर बसवण्याची परवानगी दिली होती. रविवारी सकाळी एआयएमआयएमच्या सदस्यांनी आणि काही स्थानिक अल्पसंख्याक संघटनांनी पुतळा बसवण्यास आक्षेप घेतला. हा पुतळा पालिका अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर बसवायला हवा होता, असे ते म्हणाले.


पुतळ्याला विरोध करणारे काही लोक विरोध करत असतानाच प्रतिआंदोलक आले. लवकरच, एका बाजूला एआयएमआयएम आणि टीआरएस समर्थक आणि दुसरीकडे भाजप-शिवसेना समर्थकांमुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचाही वापर केला.


आता काय परिस्थिती आहे?


पोलिसांनी कलम १४४ लागू केले असून चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. तणावपूर्ण परिस्थिती शहरभर पोलीस बंदोबस्तही उभारण्यात आला होता. पोलिस आणि महापालिका अधिकारी सर्व गटांशी बोलून हा प्रश्न सोडवत आहेत.





अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121