मुंबई: महाविकास आघाडी आणि एमआयएम युती होणार अशा चर्चांना उधाण आलेले असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत कविता करत एमआयएमवर टीका केली आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी ही कविता शेअर केली आहे. "एमआयएमची आहे हार्ड लाईन म्हणून सर्वांनी त्यांना केले आहे साइडलाईन" अशी बोचरी टीका आठवलेंनी केली आहे. "एमआयएमशी युती करण्यासाठी कोणी तयार नसेल तर त्यांनी स्वबळावर लढावे" असाही सल्ला आठवले यांनी दिला आहे.
या सर्व वादावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी एमआयएम कडून आलेला प्रस्ताव हे भाजपचेच कारस्थान असल्याचे सांगून नेहमीप्रमाणे याही वादाचे खापर भाजपवरच फोडले आहे.