मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे हिंदुत्व राज्यभर पोहोचवण्यासाठी शिवसंपर्क अभियान हाती घ्या असे राज्यातील शिवसैनिकांना सांगितले आहे. या त्यांच्या शिवसंपर्क अभियानावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी "शिवसेना म्हणजे धोरणहीन, दिशाहीन, तत्व नसलेला पक्ष" अशी बोचरी टीका केली आहे.
महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी युती करण्याचा प्रस्ताव एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला दिला होता. पण आघाडीतील सर्वच पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. याच पार्श्वभूमीवर "शिवसेनेचे हिंदुत्व राज्यभर पोहोचवण्यासाठी शिवसंपर्क अभियान हाती घ्या" असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला होता पण या अभियानावर भाजपकडून जोरदार टीका होते आहे.