नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मूडीजने भारताचा भारताचा विकासदर ९.१ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. रशिया- युक्रेन युद्धाचा थोडा परिणाम होणार आहे. या आधी मूडीजने भारताचा विकासदर ९.५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता पण रशिया- युक्रेन युद्धानंतर हा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे.
भारत हा खनिज तेलाचा सर्वात मोठया आयातदार देशांपैकी आहे. या युद्धामुळे खनिज तेलाचे दर उच्चांकी वाढले आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. वाढती महागाई, चलनवाढ ही हा विकासदर घटण्याची करणे असणार आहेत.