गांधीनगर: गुजरातमधील भावनागर येथे सोसायटीतले फ्लॅट्स सोडून निघून जा असे मुस्लिम टोळ्यांकडून धमकावले जाण्याची घटना गुजरातमधील भावनगर येथे घडली आहे. १००-१५० जणांच्या टोळ्यांनी मुस्लिम लोक धमकावत असल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे आहे. भावनगरमधील स्वस्तिक कॉम्प्लेक्स मध्ये १५ हिंदू कुटुंबे राहतात त्यांच्याकडून या तक्रारी आल्या आहेत.
"१००- १५० जणांच्या संख्येने रात्रीच्या वेळेस आम्हांला धमकावले जात आहे. आम्हांला तुमच्या बद्दल पूर्ण माहिती असून जर तुम्ही तुमची घरे आम्ही सांगू त्या किमतींना विकली नाहीत तर तुमचे काही खरे नाही" अशा शब्दांत धमकावले जात असल्याचे स्वस्तिक कॉम्प्लेक्सचे रहिवासी राजाराम अवेडा यांनी सांगितले. अशाच प्रकारच्या घटना गुजरातमधील भरूच येथेही घडत असल्याचे सांगण्यात येते आहे. मुस्लिम बहुल भागांमधून हिंदूंना हुसकावून लावण्यासाठी धमकावले जात असल्याच्या घटना गुजरातमध्ये वारंवार घडतना दिसत आहेत.