मुंबई : "कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याची कट कारस्थान रचून बदनामी केली जात असेल, तर ते योग्य नाही. सध्या राज्यात चाललेली वाटचाल शरद पवार यांनीही मान्य नसावी. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे पकडायला हवेत. पण त्यांची 'मजबुरी का नाम महात्मा गांधी' अशी अवस्था झाली आहे." अशी खोचक टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रावसाहेब दानवे यांनी म्हंटले की, "मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पाडावी आता त्यांनी बाहेर पडावे आणि काम करावे. मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी. पण जे दाऊदला मदत करतात त्यांना हे सध्या मदत करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे." असा खोचक टोला लगावला.