नवी दिल्ली : चीन, हाॅंगकाॅंग आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोना पुन्हा तीव्र गतीने वाढत आहे. चीन मध्ये १५ शहरात लॉकडाऊन आहे. तर कोरियात बुधवारी ४ लाख रुग्ण एकाच दिवसात आढळले आहेत. त्यानंतर भारत सरकारने अलर्ट जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. तसेच इस्राईल मध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे.