नवी दिल्ली: "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गेले काढणारे लोक काश्मीर फाइल्स सारख्या तथ्यांवर आधारित चित्रपटांना निव्वळ आकसापोटीच विरोध करत आहेत" अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना फटकारले आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी बोलत होते. या भाषणात त्यांनी भारतीय इतिहास आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटांसारखी माध्यमे किती महत्वाची आहेत ते सांगितले. "महात्मा गांधींसारख्या जगावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीवर भारतात एकही चांगला चित्रपट बनू शकला नाही, जेव्हा बाहेरच्या लोकांनी येऊन त्यांच्यावर चित्रपट बनवला आणि त्याला पुरस्कार मिळाले, तेव्हा जगाला त्यांची माहिती समजली तोपर्यंत ती पोचलीच नव्हती" अशा शब्दांत मोदी यांनी याबद्दलची खंत व्यक केली.
"सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणाऱ्यांची जमात सैरभैर झाली आहे, या चित्रपटात जे दाखवले गेले आहे त्याचा तर्कपूर्ण विरोध करण्यापेक्षा त्याला फक्त विरोधच केला जात आहे" असे मोदी म्हणाले. आम्ही १४ ऑगस्ट हा फाळणीच्या वेळेस झालेल्या अत्याचारांचे स्मरण म्हणून 'हॉरर डे' म्हणून घोषित केला तेव्हा सुद्धा या लोकांनी विरोध केला. भारतावर झालेल्या अत्याचारांचे स्मरण आपण ठेवून नये का? त्या घटनांचे स्मरण आपण करू नयेच का? अशा शब्दांत मोदींनीं विरोधकांवर निशाणा साधला.