बीज अंकुरे अंकुरे भाग-३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

pregnancy
 
 
मागील लेखात रज:स्रावाच्या विविध तक्रारी व बिघाड याबद्दल बघितले. त्याबद्दल अजून विस्ताराने आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
 
सर्वसाधारणपणे Normal Menstruation (नैसर्गिकपणे मासिक पाळी) ही २८ ते ३५ दिवसांनी येणे अपेक्षित आहे. रज:प्रवृत्ती होतेवेळी रक्तवर्णीय स्राव असावा. (खूप गडद, काळपट, पांढरट नसावा. आयुर्वेदामध्ये सशाच्या रक्तासमान ही उपमा दिली आहे.) रक्तस्राव ‘नॉर्मल’ आहे का, याचे आणखीन एक परीक्षण आहे - तो स्राव कापडावर पडल्यास, तो धुतल्यानंतर डाग राहता नये. हल्ली ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ व अन्य टाकाऊ प्रसाधने वापरली जात असल्याने याचे परीक्षण केले जात नाही, तसेच या रज:स्रावालाथोडा दुर्गंध असतो. तो वास नावडणारा असतो. पण अतिदुर्गंधित, सपूय (पस असल्यासमान), कुणपगंधी (मृतप्राण्याच्या वासासारखा) तो वास ‘दुर्गंध’ नसावा. पूतिगंध (सपूय गंध व कूणप गंध) ‘नॉर्मल’ रज:स्रावाचे वास नव्हेत. ती ‘अ‍ॅबनॉर्मल’ आहे, तसेच रज:स्राव हा तीन ते पाच दिवस साधारपणे असणे नैसर्गिक आहे. यापेक्षा कमी अथवा अधिक प्राकृतिक नाही.
 
प्राकृतिक रज:स्राव होतेवेळी थोडं पोट दुखणे, कंबर दुखणे, थोडे तापमान (बॉडी टेम्परेचर) अधिक असणे स्वाभाविक आहे, पण अत्यंत वेदना, अधिक रक्तस्राव, उलट्या होणे, चक्कर येणे इ.प्राकृतिक नाही, याची चिकित्सा नक्की करावी लागते. मासिक रजस्राव बरोबर आहे की चूक, याचे परीक्षण त्या स्रावाच्या रंगावरुन, गंधावरून स्रावाची तरलता आणि नियमिततेवरून केली जाते. खूप सकष्ट, संवेदना, मासिक स्राव होत असल्यास, मासिक स्रावाचे प्रमाण खूप नाही, पण गडद रंगाचे आहे, असे असल्यास वाताच्या दुष्टीमुळे, बिघाडामुळे सदोष रजःप्रवृत्ती आहे, असे समजावे. जर रजःस्राव मोठ्या प्रमाणात होत असेल, त्याचबरोबर गाठी पडत असतील, चिडचिड वाढली असेल, तर अंगाची उष्णता वाढल्यासमान जाणवत असेल, तर ही रजःस्रावाची दुष्टी पित्ताच्या दुष्टीमुळे आहे, हे समजावे. कफाच्या दुष्टीमुळे रजःस्राव अधिक काळ राहतो. स्राव थोडा अधिक चिकट व बुळबुळीत असतो. मासिक स्रावाचे प्रमाणही अधिक असते. मन खूप खिन्न होते. उदासीनता जाणवते व योनिमार्गाच्या विविध संसर्गाची (Confections) शक्यता अधिक होते.
 
कुमारीअवस्थेत जेव्हा रजःप्रवृत्ती सुरू होते (वयाच्या १२ ते २० या वर्षांमध्ये) रजःप्रवृत्तीमध्ये बिघाड होण्याची काही विशेष कारणे आहेत. या वयोगटातील मुलींना शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांना अधिक सामोरे जावे लागते. ‘फिजिकल अॅंपिरियन्स’बद्दल अधिक जागरूक असतात. अशा वेळेस अतिव्यायाम करण्याकडे काही वेळेस कल असतो किंवा वजन कमी करण्यासाठी चुकीच्या ‘डाएटिंग’ पद्धतींचा अवलंब केला जातो. त्याचबरोबर सतत मानसिक ताणतणाव, शारीरिक धावपळ, दगदग अशी सगळी कारणे असल्यास वातदुष्टी अधिक प्रकर्षाने होताना आढळते. या वयातील दुसरी एक बाजू म्हणजे अतिप्रमाणात ‘जंक फूड’चे सेवन. अतितिखट, चमचमीत, शिळंपाकं, आंबवलेले पदार्थ इ.चे अतिप्रमाणात सेवन व जेवणाच्या अनियमित वेळा तसेच आवडीचे असले की अधिक खाणे व आवडीचे नसल्यास उपाशी राहणे इ. गोष्टी या वयोगटातील मुली अधिक प्रमाणात करताना आढळतात. झोपेच्या वेळेतील अनियमितता किंवा अधिक झोपणे, उशिरा झोपणे याही सवयी १२ ते २० वयोगटातील मुलींमध्ये बघायला मिळतात. या सर्व सवयींमुळे अतिरिक्त वजन वाढून, स्थौल्यता येते. स्थौल्यता आली की काही ना काही अंत:स्त्रावी ग्रंथींमध्ये बिघाड होऊ शकतो. ‘पीसीओडी’, ‘हायपर थायरॉईड’, ‘हायपो थायरॉईडझम’ इ. तक्रारी सुरू होऊ शकतात. वरील सगळी कारणे आणि लक्षणे बदलता येऊ शकतात. पण, त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
 
 
विसाव्या वर्षानंतर ते मूल होण्याच्या वयोमर्यादेपर्यंत (म्हणजेच ‘रिप्रॉडक्टिव्ह एज ग्रुप) मध्ये रजस्त्रावातील अनियमिततेची कारणे वरीलप्रमाणे आणखी वेगळीही असू शकतात.
 
 
सगळ्यात मोठे कारण जे हल्ली बघायला मिळते ते म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरिक्त वापर. अधिक काळ व वारंवार. यामुळे नैसर्गिक अंत:स्रावी ग्रंथींचा समतोल बिघडतो. सततचे शारीरिक व मानसिक ताणतणाव हेदेखील रज:प्रवृत्तीच्या बिघाडाचे एक कारण असू शकते. शरीर व मन हे एकमेकांना साहाय्यभूत आहेत. PSYCHOSOYATIC DISORDORS (मनोकायिक आजार) यांचे प्रमाण सगळ्यात अधिक आहेत. शरीराला होणार्याा वेदनांमुळे, त्रासांमुळे मनही चंचल व कष्टी होते आणि मनाच्या घालमेलीमुळे भूक मंदावणे, मळमळणे, धडधडणे, गरगरणे, घसा कोरडा पडणे इ. शारीरिक लक्षणेही उत्पन्न होतात. तेव्हा शारीरिक कष्ट जास्त असल्यास त्याचा मनावर ताण व मानसिक ताण अधिक असल्यास त्याचा शरीरावर परिणाम नक्कीच होतो. याचबरोबर आधी वर्णिलेल्या कारणांचीही जोड या वयोगटात लागू पडते. या वयोगटात गर्भाशयाच्या काही तक्रारी जसे Fibroids किंवा polyp किंवा वारंवार होणारे संसर्ग गर्भाशयाच्या अंतस्त्वचेला सूज येणे (Endometriosis) इ. यांचे प्रमाणही वाढलेले असते.
वरील सर्व कारणांमुळे नियमित रज:प्रवृत्ती होणे शक्य होत नाही. अनियमित रज:प्रवृत्ति, कष्टार्तव, अनार्तव, अत्यार्तव यातील कोणताही बिघाड/विकृती असली की, त्याचा अन्य शरीरावरही परिणाम होताना दिसतो. उदा. केसांची अनियमित वाढ, चेहर्याववर, हनुवटीवर, शरीरावर अन्य ठिकाणी अतिरिक्त केस उगवणे. त्वचा काळवंडणे, जाड होणे, खरखरीत होणे.अचानक वजन वाढू लागणे, शरीर बेढब होणे, त्वचा निस्तेज होणे, चिडचिड वाढणे, त्रागा करणे, चिंता करणे, पोट-कंबरदुखी, श्वेतप्रदर (अंगावरुन पाणी जाणे) योनिप्रदेशी खाज व अन्य तक्रारी आणि वरील लक्षणे अधिक काळ चिकित्सेशिवाय असल्यास वंध्यत्वही येऊ शकते. पुढील लेखात रज:प्रवृत्तीच्या विविध तक्रारींबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात. (क्रमश:)
 
- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९ 
 
@@AUTHORINFO_V1@@