नवी दिल्ली: रशिया- यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस चिघळतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानेही एक महत्वाचा निर्णय घेत, युक्रेन मधून तात्पुरत्या काळासाठी भारतीय दूतावास हलवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या बाबत एक निवेदन जाहीर करून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय दूतावास काही काळापुरता पोलंडमध्ये हलवला जाणार आहे.
रशिया युक्रेन युद्धाची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळतच चालली आहे. दोन्ही देशांमधील प्रश्न चर्चेने सुटतील अशी आशा होती पण तसे काही न झालेले नाही. या युद्धामध्ये आता पर्यंत १५०० हुन जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकी ऑपरेशन गंगा मोहिमेचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबरीने या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेला कमीत कमीत फटका बसेल या दृष्टीने सरकारचे प्रयत्न चालू आहेत.