भारतातील बिबट्यांची सर्वाधिक घनता मुंबई महानगरात; 'या' संशोधनातून सिद्ध

    10-Mar-2022
Total Views | 141
leopard


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्यासंसोधनामध्ये भारतातील बिबट्यांची सर्वाधिक घनता ही मुंबई महानगर क्षेत्रातनोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्र वन विभाग, 'वाईल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटी-इंडिया' (डब्लूसीएसआय) आणि 'वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (डब्लूआयआय) यांनीकेलेल्या संशोधनामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्यातीलबिबट्यांच्या अधिवासासंदर्भातील महत्त्वाची माहिती प्रकाशझोतात आली आहे.

बिबट्या हा प्राणी भारतात सर्वत्र आढळून येतो. मैदानी भागातील घनदाट जंगले आणिदऱ्याखोऱ्यांपासून ते थेट हिमालयापर्यंत त्याचा वावर आहे. गेल्या दशकातीलसंशोधनातून बिबटे हे शेतशिवारांबरोबरच जयपूर, बेंगळूरु आणि मुंबईसारख्या शहरांजवळीलमानवी वस्ती असलेल्या भूभागातही राहत असल्याच्या नोंदी झाल्या आहेत. भारतातील ८३टक्के बिबटे हे संरक्षित क्षेत्राच्या बाहेर राहतात. मुंबई महानगर क्षेत्रातअधिवास करणाऱ्या बिबट्यांची माहिती जाणून घेण्यासाठी वन विभाग, 'डब्लूसीएसआय' आणि 'डब्लूआयआय'च्या संशोधकांनी एक संशोधन प्रकल्प केला होता. यासंदर्भातील “लेपर्ड्स इनद सिटी : टेल ऑफ संजय गांधी नेशनल पार्क अँड तुंगारेश्वर वाइल्डलाइफ सँक्च्युरी,टू प्रोटेक्टेड एरियास इन अँड अॅडजेसंट टू मुंबई, इंडिया” ही शोधपत्रिका नुकतीच प्रकाशित झालीआहे. निकीत सुर्वे, संबंदम सत्यकुमार,कल्याणसुंदरम शंकर, देवचरण जथन्ना,विकास गुप्ता आणि विद्या अत्रेय यांनी हा शोधनिंबध तयार केला आहे.
 




 हे संशोधन २०१५ साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणि२०१६ साली तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात करण्यात आले होते. या संशोधनाचेउद्दिष्ट संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्यातील बिबट्यांची वत्यांच्या भक्ष्यांची घनता तपासणे तसेच बिबट्यांचा आहार समजून घेणे हे होते. या अभ्यासात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्याआजूबाजूला अत्यंत दाट मानवी वस्ती (२०,००० व्यक्ती/चौ.किमी)असूनही उद्यानात बिबट्यांची घनता ही अतिशय जास्त (२६.३४ ±४.९६ बिबटे/१००चौ.किमी) असल्याचे आढळून आले. याउलट तुंगारेश्वरच्या आजूबाजूला मानवी घनता (१७००व्यक्ती/चौ.किमी) इतकी कमी असतानाही तेथील ग्रामीण भूभागात बिबट्यांची घनता सुद्धाबरीच कमी (५.४० ± २.९९ बिबटे/१०० चौ.किमी) दिसून आली. एका महानगरातीलसंरक्षित क्षेत्रात एखाद्या मोठ्या मांसाहारी प्राण्याची इतकी जास्त घनता असणे, हीबाब जगभरातील इतर संरक्षित क्षेत्रांच्या तुलनेत अतिशय वेगळी आहे.

या संशोधनात अभ्यास क्षेत्रातील बिबट्यांच्या विष्ठेतीलकेसांचे नमुने तपासून बिबट्यांचा आहार समजून घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला.तुंगारेश्वरमधील अभ्यासात बिबट्यांच्या आहारात ६६.७६% वाटा भटक्या कुत्र्यांचाअसल्याचे दिसून आले. हे प्रमाण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्याआहारातील भटक्या कुत्र्यांच्या ३२.०१% या प्रमाणापेक्षा जास्त होते. बिबट्यांसाठी भक्ष्यांची उपलब्धता अभ्यासतानाअसे आढळून आले की,खाद्याची उपलब्धता ही बिबट्यांची घनता ठरविण्यात महत्त्वाचीभूमिका बजावते. तुंगारेश्वरच्या तुलनेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांचीघनता जास्त असणामागील कारणही हेच असू शकते.

या अभ्यासाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यातील संशोधन कार्याचा पाया घातला आहे. येथील बिबट्यांना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी या क्षेत्रातील संशोधन कार्य आम्ही पुढेही असेच सुरू ठेवणार आहोत. आमच्या सध्या सुरु असलेल्या एका संशोधनाअंतर्गत आम्ही रेडीओ कॉलर बसवलेल्या बिबट्यांच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करीत आहोत. - जी. मल्लिकार्जुन, संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान



अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121