मुंबई : प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी सचिन वाझे यास अटक करण्यात आली होती. या बाबतीत आता एटीएसकडून नवीन माहिती हाती लागली आहे. स्कॉर्पिओ गाडीचा तपास करताना सचिन वाझे बॉम्ब निकामी करणारे पथक (बीडीडीएस) पोहोचण्या आधीच घटनास्थळी पोहोचला होते. या तपासात हस्तक्षेप झाल्याचा दावा एटीएसने केला आहे. याबाबत बीडीडीएस कडून रिपोर्टमध्ये स्पष्टीकरण देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
"अॅन्टिलियासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा तपास हा साधारण चार ते पाच तास चालू होता. मात्र आम्ही पोहोचायच्या आधीच गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे त्याठिकाणी पोहोचले होते. त्यांच्याकडून वारंवार आमच्या कामात हस्तक्षेप होत होता. गाडीत स्फोटक असल्याचे जेव्हा कळले तेव्हा सुध्दा ते सतत गाडीजवळ येऊन कामात व्यत्यय आणत होते. आमच्या प्रोटोकॉलचे ते पालन करत नव्हते.", असे बीडीडीएसच्या एका अधिकाऱ्याने रिपोर्टमध्ये सांगितल्याचे स्पष्ट झाले आहे.