सनाउल्लाह गफारी यांची माहिती दिलीत तर यूएस देणार दहा दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस

    08-Feb-2022
Total Views |

isis


वॉशिंग्टन :
अमेरिकेने आयसिस - खोरासन (आयसिस -के-) म्होरक्या सनाउल्लाह गफारी आणि काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांशी संबंधित माहिती देण्यासाठी १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ रिवॉर्ड्स फॉर जस्टिस (आरएफजे)ने त्याची अधिसूचना जारी केली.
 

शहाब अल-मुहाजिर असे सनाउल्लाह गफारीचे नाव आहे

अधिसूचनेनुसार, आयसिस - खोरासन नेता शहाब अल-मुहाजिर, ज्याला सनाउल्लाह गफारी म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या माहितीसाठी यूएस १० दशलक्ष डॉलर पर्यंतचे बक्षीस देऊ करत आहे. २६ ऑगस्ट २०२१ रोजी अफगाणिस्तानमधील काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांची माहिती देण्यासाठीही हे बक्षीस आहे, असे त्यात म्हटले आहे.
 
गफारी हा आयसिस -केचा सध्याचा नेता आहे

 
अफगाणिस्तानमध्ये १९९४ मध्ये जन्मलेला गफारी हा आयसिस के या दहशतवादी संघटनेचा सध्याचा नेता आहे. संपूर्ण अफगाणिस्तानमधील सर्व आयसिस के ऑपरेशन्ससाठी निधी मंजूर करणे आणि व्यवस्था करणे यासाठी ते जबाबदार असल्याचे विभागाने म्हटले आहे. काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस-के या अमेरिकेने प्रतिबंधित केलेली विदेशी दहशतवादी संघटनाने स्वीकारली असल्याचे म्हंटले जात आहे. या हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिकांसह किमान १८५ लोक मारले गेले जे नागरिकांना बाहेर काढण्यात मदत करत होते.आयसिस -केच्या केंद्रीय नेतृत्वाने जून २०२० मध्ये गफारीला संघटनेचा नेता म्हणून नियुक्त केले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121